
शिक्षक भारती संघटनाच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) वर्धा : .दिनेश राठोड.
दिनांक 3/12/2022 शिक्षक भारती संघटनाच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन पी.आर.पाटील
शैक्षणिक संकुल आर्वी रोड,तळेगाव (शा.पंत) येथे पार पडला,मेळाव्याचे आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे मार्गदर्शक व वक्ते मा.कपिल पाटील साहेब शिक्षक आमदार मुंबई हे होते,त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ.हर्षवर्धन देशमुख(अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती) कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा.श्री.राजेंद्र झाडे सर,राज्य उपाध्यक्ष,शिक्षक भारती महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा.श्री.दीलीपभाऊ निंभोरकर अध्यक्ष,मराठा शिक्षण संस्था,विभागीय अध्यक्ष,शिक्षक भारती अमरावती विभाग.मा.श्री.अतुल देशमुख, समन्वयक, महा.राज्य शिक्षक भारती.प्रमुख उपस्थिती मा.श्री. प्रफुल्ल कांबळे,जिल्हा अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना, मा.संजयजी खेडीकर,राज्य संयुक्त कार्यवाह,शिक्षक भारती महाराष्ट्र, मा.प्रा.किशोर वरभे सर,राज्य संघटक सचिव, शिक्षक भारती महाराष्ट्र, मा.श्री. डॉ.संदीप निंभोरकर, प्राचार्य,पी.आर.पाटील शिक्षण महा.तळेगाव, मा.अनघा वैद्य,विभागीय अध्यक्ष,महिला आघाडी, मा.श्री भाऊराव पत्रे,विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती, नागपुर, मा.प्रा. सपन नेहरोत्रा,विभागीय कार्यवाह,शिक्षक भारती नागपुर.
या कार्यक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते याप्रसंगी सन्माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली त्यांनी ,जुनी पेन्शन योजना शिक्षकांना याबद्दल केलेल्या पाठपुराव्या बद्दल चर्चा केली तसेच 20% अनुदानित 40% अनुदानित घोषित,अघोषित तुकड्याना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला आहे व निवेदन दिले आहे असे सांगितले शिक्षक भारती संघटनेने महिला कर्मचाऱ्यांना सहा महिने पर्यंतची प्रसूती रजा शासनास मंजूर करण्यास भाग पाडले तसेच वस्तीशाळेतील शिक्षकांना कायम करण्यास तत्कालीन सरकारला भाग पाडले शिक्षकांच्या समस्या आणि प्रश्न विधानसभेत वेळोवेळी मांडले व शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण करायला लावल्या व शासनाला त्याबद्दलचे परिपत्रक काढायला लावले असे सांगितले तसेच श्री राजेंद्रजी झाडे राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती यांनी ज्या शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांक पासून 12 व 24 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना तात्काळ वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लागू व्हावी शिक्षण संचालक पुणे यांचेकडे प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले असे सांगितले,शिक्षकांना 10,20 आणि 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू यावी याकरिता सुद्धा शासनाकडे पाठपुरावा केला असे सांगितले,
या कार्यक्रमाचे नियोजन मा.मारोती सयाम,जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती संघटना वर्धा,ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते याप्रसंगी वर्धा येथील पदाधिकारी श्री पंकज निंभोरकर,प्रा.किशोर पिंपरे,हिंगणघाट येथील पदाधिकारी श्री नरेश येडे,प्रवीण पाटभाजे,हेमंत परसाडे, रवींद्र उईके,पराग शेगोकर,पुरुषोत्तम कावळे,पंकज भिसे, हरिहर झाडे,प्रफुल्ल ढेपे, हसिनाताई गोरडे,मिलिंद सरोदे,संजय नांदे,संजय उरकांदे,विलास येडमे, सुनिल वटे,गजानन साखे,अनिता तींनघसे,उमेश गायकवाड रणजित कडु विलास नरकरे नितीन झोटीग,विलास बेले,विनोद वरभे,देवेंद्र पदाडे,श्री नोकरकर सर,बुचे सर,सिरसे सर,प्रा. .दिनेश राठोड सर,शशिकांत कुरसंगे.आदी उपस्थित होते,
