ji24news

एसटीच्या वसई दर्शन मोहिमेच्या दुसऱ्या फेरीलाही शून्य प्रतिसाद मिळाला….!

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )वसई 

          पालघर वसई …. एसटीच्या वसई दर्शन मोहिमेच्या दुसऱ्या फेरीलाही शून्य प्रतिसाद मिळाला. मात्र पुढील रविवारसाठी १८ प्रवाशांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, पर्यटन स्थळांमध्ये एसटीने बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वसईच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी एसटीने वसई दर्शन ही बससेवा सुरू केली होती. दर रविवारी आठवडय़ातून एकदा ही सेवा दिली जाणार आहे. १९ जून रोजी या सेवेचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी एकही प्रवासी नसल्याने सेवा रद्द करावी लागली. २६ जून रोजी दुसऱ्या फेरीतदेखील एकही प्रवासी न आल्याने दुसरी फेरीदेखील रद्द करावी लागली. मात्र पुढील रविवार २ जुलैच्या वसई दर्शनसाठी १८ प्रवाशांनी नोंदणी केल्याचे एसटीने सांगितले. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत वसई किल्ला, गिरीज चर्च, निर्मळ येथील बौद्ध स्तूप, अर्नाळा बीच, जीवदानी आणि तुंगारेश्वर मंदिर अशा सात ठिकाणी वसई दर्शन घडविले जाणार आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती १४० रुपये दर आकारला जाणार आहे.
स्थळांमध्ये बदल करण्याची मागणी
एसटीची वसई दर्शन ही सेवा चांगली असली तरी एकाच दिवशी एवढी स्थळे दमछाक करणारी आहेत. त्यामुळे तुंगारेश्वर आणि जीवदानी आदी स्थळे वगळावीत, वसई दर्शन बसमध्ये ‘टूर गाईड’ ठेवावा अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख शंकर बने यांनी केली आहे.
सध्या ही सेवा प्रायोगिक तत्वावर आहे. स्थळांबाबत पर्यटकांचा प्रतिसाद पाहून निर्णय घेण्यात येईल. पहिल्या दोन फेऱ्यांना प्रतिसाद नसला तरी पुढील फेरींसाठी प्रवाशांची नोंदणी झाली आहे – राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ (पालघर)

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर