
विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा.
*जनतेसाठी मोठा प्रश्न*
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड. विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन कित्येक वर्ष झालीत या तालुक्यामध्ये महिन्यातून चार वेळा हा बाजार भरत असतो हा आठवडे बाजार असून दर बुधवार भरत असतो आणि त्याला खरेदी तसेच विक्री करणाऱ्या व्यापारांचा भरभरून प्रतिसाद लाभतो मात्र बरेच हे बाजारात आलेले ग्राहक यांना शौचालय ही अस्वच्छ, शौचालय वरती नाव (बॅनर) किंवा त्यावरील नावाची पाटी नसल्याने नागरिकांची असुविधा दिसून येत आहे. सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील येणारे ग्राहक व दुकानदार नाराजगी व्यक्त करत आहेत.
मुख्य म्हणजे महिलांना याचा मोठया प्रमाणात अभाव व असुविधा होत असल्याने त्यांची सरकारला व शासनाला विनंती करत आहेत की लवकरात लवकर सौचालायची सुविधा करून द्यावी.
Total Users : 10828