ji24news

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

Ji 24news दिपक भोये पालघर

** जव्हार, प्रतिनिधी : सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे बुद्रुक अंतर्गत पेसा गाव सांबरपाडा येथे जाणारा एकमेव रस्त्यावर दरड कोसळली असल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. या पाड्यासाठी हा एकमेव संपर्क मार्ग असून पर्यायी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना व इतर सर्व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला की दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असून रस्ता खचतो किंवा दरड कोसळत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते व ग्रामस्थांचा तालुक्यात जाण्याचा प्रवास पुर्णपणे तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, ग्रामस्थांची दैनंदिन ये-जा तसेच अत्यावश्यक सेवा यावर गंभीर परिणाम होत आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी ऑक्टोबर 2025 ला जव्हारमध्ये आमदार हरिचंद्र भोये यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन या रस्त्याच्या दुरअवस्थेबाबत तक्रार केली होती. त्यादनंतर एप्रिल 2026 मध्ये स्थानिक आमदार हरिश्चंद्र भोये यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सांबरपाडा येथील ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याची पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करत आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर