ji24news

डॉक्टर्स दिनानिमित्त लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न…..

डॉक्टर्स दिनानिमित्त लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न….

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ).

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022
 
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत आज लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय  (एलएचएमसी ) येथे डॉक्टर्स दिन  साजरा करण्यात आला.
निःस्वार्थ सेवेसाठी वैद्यकीय जगताला  सलाम करत ,डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, “आपल्या  जीवनात आपले  डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करणे हा त्यांच्या अफाट योगदानाचे  मोल जाणून घेण्याचा  असाच एक प्रयत्न आहे.”

“हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव सुरु  आहे. समाज, मानवता आणि देशासाठी  डॉक्टर म्हणून दिलेले उत्कृष्ट समर्पण आणि अमूल्य योगदानाबद्दल, आम्ही 75  वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर्स दिन  साजरा करत आहोत.” असे ते म्हणाले.
आपले प्रयत्न देशाच्या  प्रगतीच्या दिशेने असले पाहिजेत; देश नेहमी प्रथम असला  पाहिजे.आपण आपला सेवाभाव सुरूच ठेवावा तरच आपण एक सुदृढ  भारत घडवू शकू, ज्यामुळे समृद्ध राष्ट्र  निर्माण होईल, यावर त्यांनी भर दिला.

अथक प्रयत्नांबद्दल आणि कोविड व्यवस्थापनात भारताला  जागतिक यशोगाथा बनवल्याबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांचे,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती प्रवीण पवार यांनी  आभार मानले.“सर्व रुग्णांच्या सेवेबरोबरच आपण सर्वजण निरोगी भारत आणि सुदृढ  भारतासाठी काम करत आहोत, असे त्या म्हणाल्या. सरकार आरोग्य क्षेत्रात नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे,  टेलीमेडिसिन सेवांसारखे विविध उपक्रम देशाच्या अगदी दुर्गम भागातही मिशन मोडमध्ये राबवले जात आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर