
फर्स्ट ऑल इंडिया इन्विटेशन रियल गोल्ड ऑफ आईस अँड रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत मोखाडा तालुक्यातील आदिवासी मुलींची दमदार कामगिरी…..
- जोहार इंडिया 24 न्यूज (प्रतिनिधी )..
मोखाडा दि. 3 जुलै 2022 रोजी पार्थ इंडिया स्पोर्ट्स फाऊंडेशन डी.आर.एस.ए.अकॅडमी अँड ए.के. अकॅडमी यांच्या आयोजनाने आणि आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने पहिली ऑल इंडिया इन्विटेशन रियल गोल्ड ऑफ आईस अँड रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप – बोरिवली,मुंबई येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात राज्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत मु.घानवळ ता.मोखाडा जि.पालघर मधून कु.उत्कर्षा रामदास गाडर हिने क्वाड रोलर स्केटिंगमध्ये – 10 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण मिळवले तर कु.दक्षतनया रामदास गाडर हिने देखील इनलाईन स्केटिंगमध्ये – 12 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच कु.केतकी मयूर राऊत मु.बेरिस्ते ता.मोखाडा जि.पालघर हिने इनलाईन स्केटिंगमध्ये 8 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदकाची कमाई केली आहे. या खेळाडूंनी स्केटिंग खेळात दमदार कामगिरी करून मोखाडा तालुक्याबरोबरच पर्यायाने पालघर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
ही स्केटिंग स्पर्धा आईस स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.जगराज सिंह सहनाय यांच्या उपस्थितीत पार पडली असून सोबत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.खेळाडूंना सागर स्केटिंग अकॅडमी- कल्याणचे प्रशिक्षक श्री.कुलदीप सागर सर यांचे मार्गदर्शन लाभले. मोखाड्यातील खेळाडूंच्या या दमदार कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Total Users : 10828