ji24news

  पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया व इतर आवश्यक खते तात्काळ उपलब्ध करून द्या, अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ.विनोद निकोले यांनी केली ..!

जोहार इंडिया 24 न्यूज (प्रतिनिधी )

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया व इतर आवश्यक खते तात्काळ उपलब्ध करून द्या, अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ .विनोद निकोले यांनी जिल्हाधिकारी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली आहे.
यावेळी निकोले म्हणाले की, १२८ डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदार संघात डहाणू व तलासरी ही दोन तालुके येतात. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, वाडा, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००७ गावे आणि ३८१८ पाडे आहेत. तसेच ४६७ ग्रामपंचायती आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिकू आणि नारळ तसेच इतर फळबागामध्ये लिची, आंबे, फणस, केळी इत्यादी यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. समुद्रकिनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते, त्यामध्ये मिरची, वॅनीला, टोमॅटो यांचे लागवड क्षेत्र जास्त असून दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो.
तालुक्यातील साखरे, कवडासा आणि सुर्या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी तसेच शेती साठी देखील वापरले जाते. तलासरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असुन हे पीक पावसावर अवलंबुन आहे. ज्याअर्थी गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे शेताच्या कामांना सुरवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात सध्या भात लावणीची कामे जोरदार सुरु असून त्याकरिता युरिया खताची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसापासून युरिया खताचा तुटवडा जिल्ह्यात विशेषतः डहाणू तालुक्यात भासत आहे. युरिया खत काही प्रमाणात काही कृषीसेवा केंद्राकडे उपलब्ध होताच एक ते दोन दिवसांमध्ये संपून जात आहे. त्यामुळे दूर अंतरावरून आणि दुर्गम भागातून खताच्या अपेक्षेने येणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचे युरिया खत न मिळाल्याने अतोनात हाल होत असून त्यास आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्यातील विशेषतः डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लावणी करिता व इतर पिकांसाठी युरिया व इतर आवश्यक खते तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी माकप आमदार कॉ. विनोद निकोले, डहाणू तालुका किसान सभा अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना, तलासरी तालुका अध्यक्ष रामू पागी, लहानी दौडा, सुनीता शिंगडा, लता घोरखाना आदी किसान सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर