
जोहार इंडिया 24 न्यूज (प्रतिनिधी )
पालघर जिल्हा .ता. जव्हार
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय,शहापूर येथील प्रा.राजू शनवार यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी जव्हार : सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय,शहापूर येथील मराठी विभागप्रमुख प्रा.राजू शनावार यांना “जव्हार तालुक्यातील आदिवासी लोकसहित्याचा अभ्यास”.या संशोधन कार्यासाठी नुकतीच पीएच.डी प्रधान झाली आहे. मूळचे भरसटमेट ता. जव्हार गावचे सुपुत्र असलेले प्रा.राजू शनावार यांनी आपले शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत घेतले आहे.प्राथ.शिक्षण आदिवासी आश्रमशाळा विनवळ व माध्यमिक शिक्षण जामसर विभाग हायस्कूल जामसर येथे पूर्ण केले.इयत्ता १० वीत पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.तृतीय वर्ष कला या वर्गात ते मुंबई विद्यापीठातून दुसऱ्या क्रमांकाने प्रथम श्रेणीत पास झाले, तसेच २००६ साली सेट व नेट या दोनही परीक्षा ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. आपल्या समाजाबद्दल आपुलकी बाळगणारे प्रा. राजू शनवार यांनी आपल्या प्रबंधातून जव्हार तालुक्यातील आदिवासींचे राहणीमान,लोककला,लोकनृत्य,विधीनाट्य व जव्हारच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना डॉ.पद्माकर तामगाडगे यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

Total Users : 10829