ji24news

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये पालघरमध्ये किंचित वाढ .

  जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )        


पालघर  ता. २० : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. बहुतेक प्रकरणे एमएमआरमधून नोंदवली जातात. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यापैकी ५५ टक्के पालघर आणि ३९ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. आतापर्यंत शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
स्पेशालिस्ट इमर्जन्सी मेडिसिन डॉ. किशोर साठे यांनी सांगितले, की गेल्या १५ दिवसांत आम्हाला एच १ एन १ प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये घसा खवखवणे आणि खोकल्याची सौम्य लक्षणे आहेत. अनेक सहव्याधी असणाऱ्या वृद्ध रुग्णांना आयसीयूची आवश्यकता भासत असून, रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. आता एच १ ए १ रुग्णांसाठी नवनवीन औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार रोखणे सोपे आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यातील इतर आजारांबरोबरच स्वाइन फ्लूनेही जोर पकडला आहे. राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ३८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २२ रुग्ण पालघरमधील आहेत; तर उर्वरित प्रकरणे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत; तर मुंबईत स्वाइन फ्लूचे १५ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापुरातही एकाचा मृत्यू झाला असल्‍याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
स्वाईन फ्लू आणि कोविड रुग्णांमध्ये ताप, खोकला आणि घसा खवखवणे यांसारखी लक्षणे सारखीच असतात, ज्यामुळे वाढ झाल्यास तीव्र श्वसन समस्यादेखील उद्‍भवतात. स्वाइन फ्लूची बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. कोविडसारखीच खबरदारी घेतली पाहिजे. मास्क दुसऱ्या इन्फ्लूएंझापासूनही वाचवू शकतो, त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता राखली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

पालघरमध्येही संशयित मृत्यू
पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी म्हणाले, १० जुलै रोजी ९ वर्षांच्या मुलींच्या झालेल्या मृत्यूचे कारण अद्याप प्रलंबित आहे, कारण स्वाइन फ्लू आणि झिका व्हायरससाठी चाचणी झालेली नाही. आश्रमशाळेतील सात मुले पॉझिटिव्ह आढळून आली असून, तपासणीनंतर आणखी १५ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे.

कोविडसारखीच खबरदारी घेतली पाहिजे. मास्क दुसऱ्या इन्फ्लूएंझापासूनही वाचवू शकतो, त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता राखली पाहिजे, 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर