ji24news

ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आकर्षक आणि लॅमिनेटेड प्रमाणपत्र द्या:शिक्षक भारतीची मागणी

जोहार इंडिया 24 न्यूज (प्रतिनिधी )

ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आकर्षक आणि लॅमिनेटेड प्रमाणपत्र द्या:

शिक्षक भारतीची मागणी….!

ठाणे . वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आकर्षक व लॅमिनेटेड प्रमाणपत्र छपाई करून द्यावे अशी मागणी शिक्षक भारतीने शिक्षण सचिव तसेच शिक्षण आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे संचालक यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. १ जून २०२२ पासून राज्यात इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड अ‍ॅपच्या माध्यमातून वरिष्ठ व निवड श्रेणीचे सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षण शुल्क रुपये दोन हजार देऊन प्रथमच अशाप्रकारे आँनलाईन नाविन्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याचा अनुभव शिक्षकांना मिळाला आहे. अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जात शालेय कामकाज करून दररोज चार ते पाच तास प्रशिक्षण करणे, व्हिडीओ पाहणे , स्वाध्याय लिहिणे इत्यादि कामे करून शिक्षकांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आँनलाईन प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे हे प्रमाणपत्र आकर्षक व लॅमिनेटेड प्रमाणपत्र छपाई करून द्यावे अशी मागणी करण्यात आली असुन प्रशिक्षणासाठी नोंदणी करू न शकलेल्या शिक्षकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करून निरंतर ऑनलाईन प्रशिक्षण सुरू ठेवावे असं सुद्धा शिक्षक भारतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच दि. 30 मे 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा.
अशा स्वरुपाच्याच मागण्या शिक्षक भारती ने केल्या असुन या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचंही सुभाष मोरे यांनी सांगितलं आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर