
खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ यांना ‘आदिवासी भूषण’ पुरस्काराने सन्मानित ..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
कासा, ता. १० (बातमीदार) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात कासा येथील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन करणारे खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ यांना ‘आदिवासी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तर पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, खादी ग्रामोद्योगचे शिशपालजी सिंह, डॉ. विश्वास वळवी, जयवंत सोमण यांच्या उपस्थितीत घाटाळ यांचा सन्मान करण्यात आला.

Total Users : 10829