
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )खोडाळा.
खोडाळा शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा..!
खोडाळा: दि .९ जागतिक आदिवासी दिनी खोडाळा विभागातील आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचे कार्य केले व पुढील येणाऱ्या पिढीला आपल्या सांस्कृती बद्दल व आपल्या क्रांतीकारकाचा इतिहास हा माहिती व्हावा म्हणून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर भाष्य करण्यात आले,
यावेळी खोडाळा येथील ईदरा नगर येथे महापुरुषांच्या प्रतिमेला अभिनंदन करून रॅली काढण्यात आली व घोषणांच्या जल्लोषात रॅली ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी येऊन येथे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याच प्रमाणे प्रथम व द्ववितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला या वेळी प्रदीप वाघ है कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, त्याच प्रमाणे जिल्हा परिषद सदस्य कुसुम ताई झोले,सभापती आशा ताई झुगरे, सामाजिक कार्यकर्ते मिलींद झोले,भरत गारे गुरुजी, सचिन पाटील,उमाकांत हमरे,सरपंच प्रभाकर पाटील, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
Total Users : 10829