ji24news

पालघर शहरातीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तारपा नृत्याने साजरा करण्यात आला..!

पालघर शहरातील जनतेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला..!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

पालघर ,सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी पालघर नगरपरिषद तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित शोभयात्रा कार्यक्रम हा माहीम रोडवरील लक्ष्मीनारायण मंदिरापासून निघून पालघर रेल्वे स्टेशन कैलासवासी नवनीत भाई शहा मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने गेली.शोभायात्रेत अत्यंत उत्साहात पार पाडली ह्या शोभायात्रेत शिवकल्लोळ ढोल पथक,आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना,पालघर जिल्हाध्यक्ष श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब यांचे सोनाळे विवळवेढे (महालक्ष्मी) ता.डहाणू.जि.पालघर येथील तारपा पथक आदिवासी तरुण तरुणी यांनी पारंपारिक वेशभूषा सादर करून आदिवासी कसा निसर्गपूजक आहे हे चित्राचे तारपा नृत्य देखावा कार्यक्रमात खुपच छान सुंदर तारपा नाच नृत्य सादर केले.आर्यन शाळा,केनम शाळा,व आंबेडकर नगर टेंभुर्डे यांच्या लेझीम पथकाने शोभयात्रेला शोभा आणली.बैलगाड्यांवर भारतीय एकतेचे प्रतिक म्हणून विविध पोशाख परिधान(घालून) करून मुले उभी होती.घोडा गाडीच्या बग्गीत भारत माता ????,अहिल्यादेवी होळकर,व झाशीची राणी यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी होते.पालघर मधील सर्व जाती धर्मातील लोकांनी १५ ऑगस्ट २०२२ ला भाग घेतला,भारतातील सर्व जाती धर्मातील लोक समाज आज पालघर शहरात (एकवटले) एकत्रित आले होते.
“हम सब एक है, या घोषवाक्याने घोषणा सुरु होत्या,जीवन विकास हायस्कूलने पर्यावरण रक्षणाचा देखावा तयार केला होता.आर्यन शाळेने भगतसिंग,राजगुरु सुखदेव यांच्या फाशीचा देखावा तयार करण्यात आला होता.ट्विंकल स्टार स्कूल या शाळेने पंढरीची वारी देखावा तयार केला होता.ब्रह्मकुमारी यांनी देशभक्तीपर देखावा केला होता.भगिनी समाज शाळेने क्रांतिकारक क्रांतिवीरांचा देखावा तयार करण्यात आला होता.आनंदवन वृद्धाश्रम व इनरव्हील क्लब यांच्यातर्फे सिनियर सिटीजन आणि भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा परिधान करण्यात आल्या होत्या,रामकृष्ण गार्डन सोसायटीने क्रांतिकारक नेत्यांची वेशभूषा परिधान केलेला देखावा तयार केला होता.दीपा शेट्टी यांच्या डान्स अकॅडमी ने भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून नृत्य सादर केलं,प्रिती शिंदे नृत्य शाळा यांनी ट्रकवर महाराष्ट्रातील विविध वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.जिल्हा परिषद शाळा वेवूर येथील मुली मुले विद्यार्थी यांनीही सहभाग घेतला होता.तसेच पालघर शहरातील व जिल्ह्य़ातील सर्व जाती धर्मातील लोकांनी या १५ ऑगस्ट २०२२ च्या शोभायात्रेत भाग घेतला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन नगराध्यक्ष पालघर
डाॅक्टर सौ.उज्ज्वला केदार काळे मॅडम व मा.श्री.केदार काळे साहेब आणि पालघर जिल्हा चे सन्माननीय शिवसेना खासदार श्री.राजेंद्र गावित साहेब खासकरून उपस्थित होते.तसेच भारतीय अस्मिता पार्टी(BAP) पालघर जिल्हाध्यक्ष व आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब आणि भारतीय अस्मिता पार्टी पालघर टीम व नगराध्यक्ष पालघर व सर्व नगरसेवक आणि नगरपालिकेतील कर्मचारीवर्ग आणि विविध राजकीय पक्षाचे पुढारी व स्थानिक लोक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर