ji24news

शासनाची माहेरघर योजना कागदोपत्रीच राबवली,अधिकार्‍यांची खर्‍या अर्थाने चौकशी करून कारवाई करायला हवी..!मोखाडा तालुक्यातील जुळे दगावल्यानंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर..!

शासनाची माहेरघर योजना कागदोपत्रीच राबवली,अधिकार्‍यांची खर्‍या अर्थाने चौकशी करून कारवाई करायला हवी..!मोखाडा तालुक्यातील जुळे दगावल्यानंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर..!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

    खोडाळा:  सचिन पाटील .

खोडाळा: मोखाडा तालुक्यातील जुळे दगावल्यानंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरीच प्रसुती होवून दोन बाळे दगावल्याची घटना घडल्यानंतर वाडा तालुक्यात गर्भवतीला रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे धावपळ करावी लागल्याची घटना घडली.

यामुळे आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच गरोदरमातांसाठी पावसाळ्यात उपयुक्त ठरणारी माहेरघर योजना नेमकी आहे कुठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पावसाळ्यात किंवा रस्ते नसलेल्या गावपाड्यांतील गर्भावतींसाठीच ही योजना असून योजना चांगली राबवली गेली असती तर या घटना  घडल्या  नसत्या असा आशावाद व्यक्त होत आहे.
यामुळे अशा कल्याणकारी योजना कागदावरच राबवणार्‍या अधिकार्‍यांची खर्‍या अर्थाने चौकशी करून कारवाई करायला हवी जेणेकरून अशा कामचुकार अधिकार्‍यांवर जरब बसेल अशी मागणी सर्व सामान्य नागरीक करीत आहेत. दुर्गम भागात अवघड रस्ते तसेच का ठिकाणी रस्तेच नसल्यामुळे गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये दाखल करणे जिकरीचे बनते. अशा घटना पालघर जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांत घडल्या देखील आहेत.अशा महिलांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर ,नांदेड ,नंदुरबार,नाशिक,अमरावती गोंदीया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या ९ जिल्ह्यात माहेरघर योजना राबविण्यात येते.
या योजनेनुसार जिथे रुग्णवाहिका वैद्यकीय सेवा पुरवण्यात अडचणी आहेत. तेथील गर्भवती महिलांना संभाव्य प्रसुतीच्या चार ते पाच दिवस अगोदरच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते, तिथ पासून प्रसुतीपर्यंत त्या महिलेच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था त्याच बरोबर बुडीत मजुरी म्हणून दररोज २०० रुपये एवढी रक्कमही दिली जाते. अशी सर्वंकष सुंदर अशा योजनेला मूठमाती देण्याचे काम स्थानिक आरोग्य यंत्रणाकडून होत असल्याचे समोर आले आहे.
कारण जर अशा चांगल्या योजना असताना घरी प्रसुती होतेच कशी हा प्रश्न आहे. मरकटवाडी येथील घटना याला अपवाद असली तरी आजही ग्रामीण भागात अनेकदा प्रसुती घरीच होतात. मात्र कागदोपत्री मात्र आरोग्य केंद्रात दाखवल्या जाण्याचे प्रकार घडतात यामुळे शासनाची माहेरघर योजना कागदोपत्रीच राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.

शासनाची माहेरघर योजना कागदोपत्रीच राबवली,अधिकार्‍यांची खर्‍या अर्थाने चौकशी करून कारवाई करायला हवी..!मोखाडा तालुक्यातील जुळे दगावल्यानंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर..!

यामुळे अशा कल्याणकारी योजना कागदावरच राबवणार्‍या अधिकार्‍यांची खर्‍या अर्थाने चौकशी करून कारवाई करायला हवी जेणेकरून अशा कामचुकार अधिकार्‍यांवर जरब बसेल अशी मागणी सर्व सामान्य नागरीक करीत आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर