
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे चर्चात्मक मुलाखत या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन …!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्हा – शनिवार दिनांक २७ ऑगस्ट 2022रोजी कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय तलासरी येथे चर्चात्मक मुलाखत या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात समाजातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करून विद्यार्थ्यांकडून त्यांची मुलाखत घेण्यात येते.
या नाविन्यपुर्ण उपक्रमासाठी सुरवातीलाच पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ यांना आमंत्रित केले होते. सदर कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घाटाळ यांना त्यांच्या समाज कार्याविषयी व खगोलशास्त्रीय वैज्ञानिक विषयावर अतिशय ज्ञानवर्धक प्रश्न विचारले.यावर चंद्रकांत घाटाळ यांनी दिलेल्या उत्तरानीं विद्यार्थी भारावून गेले. तसेच घाटाळ यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सदर कॉलेजचे विद्यार्थी शैलेश पाटील व त्याच्या टिम ने केले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राजपूतसर उपस्थीत होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाकडेसर यांनी केले. या नवीन उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Total Users : 10828