
आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो आणि आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य . ह्या दोन्ही घटनांचा शिक्षक भारतीकडून निषेध …..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्हा :दि .29 ऑगस्ट 2022 रोजी सर्व शिक्षणाधिकारी , सर्व तहसील कार्यालयात जाऊन यांना देण्यात आले . तसेच सर्व राज्य पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांनी सदर निवेदन स्वतःच्या ईमेलद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना ईमेल केले असून .निवेदन देताना फोटो काढाले . सदर फोटो आणि बातमी स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात यावी. तसेच न्यूज चैनल वर संघटनेच्यावतीने पालघर जिल्हा शिक्षक भारतीने आपली भूमिका मांडाली आहे .
आज शिक्षक भारती पालघरच्यावतीने एका लेखी निवेदनाद्वारे वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाचा व आमदार प्रकाश बंब यांनी शिक्षकाबाबत केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा राज्यभर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शाळांना शिक्षकांचे फोटो ए [A4 ]फॉर साईज पेपरवर वर्गात लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. उपरोक्त दोन्ही घटनांचा शिक्षक भारती निषेध करते.
विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. 99.99 % शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. दोषींवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही पण त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये.
आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याबाबत माननीय शिक्षण सचिव व मा शिक्षण आयुक्त यांना आदेशित करावे ही विनंती संघटनेच्यावतीने पालघर जिल्हा शिक्षक भारतीने आपली भूमिका मांडाली. दरम्यान पालघर जिल्हा शिक्षक भारती अध्यक्ष -अनिल शेलार ,कार्यवाहक -रवींद्र पिंपळे,उपाद्याक्ष -झुंबर ढाकणे, हेमंत घाटाळ,जगन्नाथ पाटील ,लीलाधर तलेळे.सुशांत पाटील. जिल्हा संघटक -गणेश कुमावत ,प्रा .किरण थोरात .पालघर तालुका अध्यक्ष प्रा.सोमनाथ सातपुते,डहाणू तालुका अध्यक्ष- महेश भुसारा ,चरित्र डोंगरकर,वाडा तालुका अध्यक्ष-सूभाष शेलार ,सदस्य -अनिल गायकवाड ,संदीप पाटील, राहुल माळी , माधुरी लोखंडे ,वडे सर ,उज्वल पारगावकर .इत्यादी बहूसंखेने शिक्षक वर्ग निषेदाचे निवेदन देण्यासाठी शिक्षणाधिकारी,तहसील कार्यालयात येथे निवेदन दिले .

दरम्यान आपले गुरुजी या योजनेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा घेतलेलाही निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि आमदार प्रकाश बंब यांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याबद्दल त्वरित कारवाई करण्यात यावी या शिक्षक भारतीने केलेल्या मागणीला जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविल्याचे दिसून येत आहे.यानुसार आमदार प्रकाश बंब यांच्यावर यथोचित दखल घेऊन आवश्यक व उचित कारवाई शासन व्यवस्थेकडून करण्यात यावी.
त्याचबरोबर आपले गुरुजी या योजनेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत. शासनाने घेतलेले हे निर्णय रद्द केले नाहीत तर भविष्यामध्ये मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आला आहे. पालघरचे जिल्हा शिक्षक भारती अध्यक्ष -अनिल शेलार हे जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी] ह्यांसी बोलत होते .
Total Users : 10829