
वर्गात शिक्षकांचा छायाचित्र नकोच आणि आमदार प्रशांत बंब यांनी
शिक्षकांबाबत केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा शिक्षक भारतीकडून निषेध…।!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
रत्नागिरी दि . 29 ऑगस्ट 2022 आज शिक्षक भारती रत्नागिरीच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाचा व आमदार प्रकाश बंब यांनी शिक्षकाबाबत केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा राज्यभर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनाने नुकतेच सर्व प्राथमिक/माध्यमिक शाळांना पत्राद्वारे
कळवून आपले गुरुजी या योजनेअंतर्गत सर्व वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावण्याबाबतची सूचना केली आहे.
सदर सूचनेचा आज शिक्षक भारतीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
त्यानुसार आज कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी यांच्याकडे आपले गुरुजी या योजनेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाचा लेखी निषेध व्यक्त करणारे लेखी निवेदन सादर करण्यात आले. त्याचबरोबर सदर निवेदनाद्वारे आमदार प्रकाश बंब यांनी विधानसभेत शिक्षणविषयक प्रस्तावावर चर्चा सुरू असताना शिक्षकांविषयी व्यक्त केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आज राज्यभर चाललेल्या या आंदोलनानुसार रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी सौ सुवर्णा सावंत यांना भेटून निषेध व्यक्त करणारे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
यानुसार आमदार प्रकाश बंब यांच्यावर यथोचित दखल घेऊन आवश्यक व उचित कारवाई शासन व्यवस्थेकडून करण्यात यावी.
त्या बरोबर राज्यात सोमवरी अनेक ठिकाणी काळ्या फीतीही लाऊन शिक्षकांनी निषेध व्यक्त करण्यात आला.
श्री आरेश्वर हायस्कूल आरे या. देवगड जि. सिंधुदुर्ग आपले गुरुजी या परिपत्रकाच्या विरोधात तसेच आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध काळ्याफिती लावून केला.
आदर्श विद्या मंदिर किंजवडे तालुका देवगड या प्रशालेमध्ये आमचे गुरुजी या परिपत्रकाचा तसेच आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध काळेफिती लावून केला.
त्याचबरोबर आपले गुरुजी या योजनेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत. शासनाने घेतलेले हे निर्णय रद्द केले नाहीत तर भविष्यामध्ये मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन देताना शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष व मुख्याध्यापक सुभाष जाधव, जिल्हा कार्यवाह आणि पतपेढीचे विद्यमान संचालक निलेश कुंभार आणि रत्नागिरी शिक्षक भारतीचे सचिव शिवाजी पांढरे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
दरम्यान आपले गुरुजी या योजनेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा घेतलेलाही निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि आमदार प्रकाश बंब यांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याबद्दल त्वरित कारवाई करण्यात यावी या शिक्षक भारतीने केलेल्या मागणीला जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविल्याचे दिसून येत आहे.
Total Users : 10829