
हिरवा देव उत्सव नांदगाव राजेवाडी संपन्न ..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )सौरभ कामडी.
जव्हार दिनांक ०३/०९/२०२२ रोजी तालुक्यातील आदिवासी आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था आयोजित हिरवा उत्सव समिती ला जव्हारचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनोज कामडी व पत्रकार भरत गवारी साहेब यांनी आज हिरवा देव उत्सव समिती नांदगाव राजेवाडी येथे भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था नांदगाव राजेवाडी संस्थेचे अध्यक्ष संजय भला यांनी पत्रकार यांचे टोपी व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व मनोज कामडी यांनी उपस्थित ग्रामस्थ व युवकांना हिरवा देव उत्सव ,आदिवासी संस्कृती, जतन व संवर्धन कसे केले पाहिजे व हिरवा देव उत्सव सुरू केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी ,पत्रकार सौरभ कामडी व इतर ग्रामस्थ ,युवक उपस्थित होते.
Total Users : 10829