
पालघर जिल्ह्यातील शिक्षक भारतीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची सभा सेवाश्रम विद्यालय बोईसर येथे संपन्न ..!,
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर :-रविवारी दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11.30 वा. पालघर जिल्हा शिक्षक भारतीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष,कार्यवाह आणि जेष्ठ कार्यकर्ते या सर्वांची एकत्रित महत्त्वाची सभा सेवाश्रम विद्यालय, बोईसर या ठिकाणी संपन्न झाली .
सदर सभेला शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी पाटील हे सभेला आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन, विचारविनिमय करून मार्गदर्शन केले .
सदर सभेमध्ये शिक्षकांचे विविध प्रलंबित समस्यावर विचारविनिमय व विविध शंकांचे समाधान ही करण्यात आले .
तरी सदर सभेला पालघर जिल्ह्यातील शिक्षक भारतीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सभेला शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी पाटील हे सभेला आवर्जून उपस्थित राहून संभोंदित केले की ,आज आपल्याशी संपर्क साधताना मनःपूर्वक आनंद होत आहे .मी गेल्या सुमारे 33 वर्षापासून एक शिक्षक कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष स्वरूपात शिक्षक चळवळीमध्ये सहक्रियपणे कार्यरत आहे .शिक्षक चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असताना शिक्षकाचे प्रलंबित प्रश्न समस्या, त्यावर उपाय शोधणे व संबंधाकडे पाठपुरावा करणे अशी प्रमुख जबाबदारी शिक्षक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याची असते. मी हेच जबाबदारी सहक्रिय व अभ्यासू पद्धतीने आणि संबंधित पीडित शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळेपर्यंत यशस्वीपणे पार पाडण्याचे आपणासमोर आहे. माझी एक सतत सतावणारी खंत व्यक्त करीत आहे, गेल्या काही वर्षापासून शिक्षेक चळवळीतील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना काम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ,अशी सद्यस्थिती आहे .यामागील बाबींचा शोध घेतला असता माझ्या मतानुसार शिक्षक चळवळीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न हे प्रशासननाकडे सादर केल्या जाणाऱ्या शिक्षक आर्थिक लाभाच्या विविध प्रस्तावांना व्यक्तिगत मान्यता देतांना होणारा लक्षणीय विलंब व खोपावलेला भ्रष्टाचार यामुळे शिक्षक चळवळीत या माध्यमातून पुरेसा दबाव गट तयार होण्यासाठी कमी पडत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे .याबरोबर शासनाच्या विविध धोरणाचा व त्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयामुळे ही शिक्षक चळवळीवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे .यामध्ये बदल घडवून येण्यासाठी केवळ शिक्षकांचा नेतृत्वाखालील शिक्षक चळवळ पुन्हा अधिक जोमाने कार्यरत होण्यासाठी आपण सर्व शिक्षक बंधू भगिनींनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे सध्या शिक्षक व शिक्षण व्यवस्थेपुढे असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम शिक्षक प्रतिनिधींची नितांत गरज आहे .यामध्ये शिक्षकांच्या आवाजाला साथ देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळाच्या माध्यमातून शिक्षक आमदार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे शिक्षक आमदार माननीय श्री कपिल पाटील साहेब यांचे सह शिक्षक चळवळीतील काही शिक्षक आमदारांनी अतिशय अभ्यासुवृत्तीने व शिक्षक चळवळीचे अखंड बांधिलकी ठेवत व पोट तिडकीने शिक्षण शिक्षकाबाबत असलेल्या प्रश्नानांबाबत सोडवणुकीसाठी यशस्वीपणे पाठपुरावा केल्याचे आपण पाहिले आहे ,त्यांच्या कार्यपद्धतीचा राज्यभर शिक्षकाकडून स्वीकार केला असून ही आजची वस्तुस्थिती आहे. 

यापुढे विधान परिषदेतील शिक्षक आमदाराच्या यादीमध्ये शिक्षक प्रश्नाला वाचा फोडणारा व शिक्षक चळवळीमध्ये सहकार्य असलेल्या शिक्षकच सहभागी होणे ही आज काळाची गरज बनली आहे .आज बदलत्या काळात शासनाकडून माध्यमिक उच्च माध्यमिक विभागावर अनेक चुकीचे व अन्यायकारक निर्णय लादले जात आहेत .यामुळे शाळेतील शिक्षकांची संख्या वेगाने कमी होत आहे .शिक्षक चळवळ शिक्षक भरती ला मर्यादा निर्माण केल्या जात आहे. शासनाकडून शाळांना मिळणारा अनुदानाचा हक्काचा वाटा जाणीवपूर्वक कमी करण्याचे धोरण अवलंबले जात आहेत सरसकट सर्वांनीच निवड श्रेणी देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे .सर्वच शाळांना मुख्याध्यापक पद मंजुरी आवश्यक आहे. सर्व कर्मचाऱ्यांना डीसीपीएस व आता एनपीएस स्वरूपाने आणलेली नवीन पेन्शन योजना लागू करून खऱ्या अर्थाने शिक्षक चळवळीने आजपर्यंत कष्टाने मिळवलेले संरक्षण व आर्थिक लाभ कमी करण्याचा प्रयत्न शासन व्यवस्थेतून होत आहे. अशा सध्याच्या काळात विधान परिषदेमध्ये शिक्षक चळवळीमध्ये सतत कार्यरत असलेल्या प्रतिनिधीच शिक्षक आमदाराच्या रूपाने पाठविणे ही शिक्षकासाठी अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे हे वास्तव स्वीकारूनच यापुढे त्या दृष्टीने प्राधान्यने विचार करून प्रत्यक्ष निवडणूक काळात राजकीय स्तरावरील हस्तक्षेपाचा फारसा विचार न करता शिक्षकांच्या भवितव्याचा व शिक्षक चळवळीला बळकट करण्याबाबत गंभीरपणे विचार करावा ही विनंती केली .यासाठी आपणाकडून राज्यातील आगामी जाणीव जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये शिक्षक चळवळीत 33 वर्ष सहक्रिय कार्य केलेल्या माझ्यासारख्या शिक्षक कार्यकर्त्यांना प्राधान्य क्रमाने ताकद द्यावी असे मी विनम्र आव्हान करीत आहे ,असे केल्याने आपल्यातूनच विधिमंडळात गेलेल्या प्रतिनिधी तन-मंधनाने व शिक्षक चळवळीशी बांधिलकी बाळगत अपेक्षित काम करू शकील अशा मला स्वार्थ विश्वास आहे .याबरोबर शिक्षकांना व शिक्षक चळवळींना यापूर्वीच आपले कटू अनुभव पाहता निवडणुकीनंतर आपल्याला पस्तावण्याची वेळ येणार नाही .
आपण सर्वांनी या विचाराचा स्वीकार करावा असा आग्रह करतो भविष्यकाळात किंवा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या प्रत्यक्ष कालखंडामध्ये समोर येणाऱ्या कोणत्याही दबावाला आणि अन्न कसल्याही आमिषाला बळी न पडता केवळ शिक्षक चळवळ जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न करावा ,अशी आग्रहाची विनंती करतो मला खात्री आहे की आपण माझ्या विचारांचा स्वीकार करून माझ्यासारख्या शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्यांना विधिमंडळात जाऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी ताकद द्याल या कामी आपले सहकार्य मिळेल अशी खात्री ही व्यक्त केली ,आणि त्यांनी अशा प्रकारे पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आव्हान केले आणि त्यांचे आभारही व्यक्त केले.
दरम्यान पालघर जिल्हा अध्यक्ष अनिल शेलार यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व आजी -माजी पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन करताना अनेक प्रलबित शिक्षकांचे प्रश्ननाबाबत खंत व्यक्त केली . शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी पाटील हयांना शुभेच्छा दिल्या .त्यावेळी सर्व आजी -माजी पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या .
पालघर जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेलार ,झुंबर ढाकणे , हेमंत घाटाळ,शुषांत पाटील, संदिप पाटील, जगन्नाथ पाटील,शुभाष शेलार, ,उपाध्यक्ष,सर्व जिल्हा पदाधिकारी.रवींद्र पिंपळे जिल्हा कार्यवाह, महिला प्रमुख.मंदा पाटील,आश्रम शाळा प्रमुख प्रकाश जाधवर जिल्हा संघटक,किरण थोरात, गणेश कुमावत, राहुल माळी,नितीन बोबांडे सर्व तालुका अध्यक्ष, प्रल्हाद थालेकर, महेश भुसारा,चरीत डोंगरकर,सागर नागरगोजे, जमादार सर,कोमल जाधव , सर्व महिला प्रतिनिधी,मानव विकास,व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सर्व पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी मंडळ.तालूका सर्व प्रतिनिधी. शिक्षक भारती जिल्हा पालघर परिवार याठिकाणी बहुसंख्याने उपस्तीत होता त्यावेळी रक्त कर्ण प्रा . किरण थोरात यांनी सूत्र संचालन केले ,तर प्रा . सोमनाथ सातपुते यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले .
Total Users : 10829