
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक जव्हारच्या शाही ऊरुसाला प्रारंभ,जामा मशिदीला आकर्षक रोषणाई,-जिमखाना मैदानात पाळणे,घाणीचे साम्राज्य,दुर्गंधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात. जव्हार नगरपरिषदेचे दुर्लक्ष,गटारींची झाकणे मोकळी अपघाताला आमंत्रण…….!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
सौरभ कामडी , मोखाडा
दि.१६ सप्टेंबर २०२२.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात हिंदू-मुस्लीम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक असलेल्या ऐतिहासिक शाही उरुसाला सुरुवात झाली आहे.यंदा ऊरूसावर कोरोनाचे सावट नसले तरी पावसाचे सावट असल्याने येणाऱ्या दुकानदारांचे मात्र हाल झाले आहेत. जव्हार शहरात संस्थानकालीन ऐतिहासिक परंपरा जपणारा “औलिया पीर शहा सदरुद्दीन बदरुद्दीन हुसैनी चिश्ती( रहमतुल्लाह अल्लाह) यांचा ५७० वा ऊरुस जव्हार शहरात दिमाखात सुरु झाला आहे.त्यामुळे हिंदू-मुस्लीम बांधवात आनंदाचे वातावरण आहे. हा ऊरुस ३ दिवस भरणार आहे.
त्यामुळे मुस्लीम बांधवाकडून सुन्नी जामा मशिदीला आकर्षक,सजावट रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.हि रोषणाई भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. हा ऊरूस १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत भरविण्यात आला आहे. हा ऊरुस हिंदू-मुस्लीम बांधवाचा एकोपा जोपासणारा आहे. हिंदू बांधव संदानंद महाराज तर मुस्लीम बांधव सदरुद्दीन बाबा म्हणून भक्ती भावाने ऊरुस साजरा करतात. उरुसाच्या पहिल्या दिवशी १६ तारखेला संदल शरीफ मिरवणूक,लंगर-ए-सदरुद्दीन(खिर) तर १७ तारखेला सुन्नी जामा मशिदीपासून चादर शरीफ मिरवणूक काढली जाते तर रात्री कवालीच्या बहारदार कार्यक्रमाची रंगत पाहावयास मिळणार आहे.यावेळी कोरोना कालावधी नंतर दोन वर्षांनी कवाल्यांचा शानदार कार्यक्रम रंगणार आहे. जुनेद सुलतानी व अजीम नाजा यांच्या कवाल्या होणार आहेत.
उरुसाच्या तिसऱ्या दिवशी १७ तारखेला ख्वाॕजा पीर चा संदल भरणार आहे.या दिवशी राजे महेंद्रसिंग मुकणे यांच्या हस्ते ध्वज लावण्यात येतो.
ऊरुसाची यंदा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच हि मोठी जञा भरत आहे.ह्या ऊरुसात खेळण्याची दुकाने,भांड्यांची ,कपड्यांची,चप्पलांची,सौंदर्य प्रसाधानाची दुकाने,खवय्यांसाठी विविध व्हाँटेल,आईसक्रिम ची दुकानांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
याशिवाय शहरातील जिमखाना मैदानावर होडी,आकाश पाळणे,मौत का कुआ,ट्रेन,असे विविध पाळणे आले आहेत. माञ जिमखाना मैदानात पावसामुळे सर्वत्र चिखल होऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसेच मैदानातील गटारींचे उघडे चेंबर अपघाताला आमंत्रण देत असुन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.माञ जव्हार नगरपरिषदेकडून याठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेतली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जिमखाना मैदानात डि.डि.टी पावडर फवारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जव्हारच्या शाही ऊरुसात लाखो भाविक येत असतात.पालघर,ठाणे,भिंवडी,कल्याण,नासिक,ईगतपुरी,संगमनेर,सेलवास या ठिकाणांहुन भाविक दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हिं -मुस्लीम बाधंवाची सामाजिक बांधिलकी जपणारा हा ऊरूस खास आकर्षण आहे.

Total Users : 10829