ji24news

कोकण शिक्षक मतदार संघातील मतदार धनाजी पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची भेट ..!

कोकण शिक्षक मतदार संघातील मतदार धनाजी पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची भेट

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

सिंधुदुर्ग जिल्हा ;-
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लवकरच संपन्न होत आहे.
या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने अधिकृत उमेदवार म्हणून धनाजी पाटील यांची निवड केली आहे
कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनाजी पाटील यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेतली.
यावेळी निवडणूकीबाबत चाललेल्या घडामोडींचा आढावा घेतला.
यावेळी शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी धनाजी पाटील यांनी शिक्षकांना उपयुक्त ठरणारे संकलन शिक्षकांसाठी या संग्रहाच्या निर्मिती केल्याबद्दल, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील अधिक चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. नुकतेच या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या संग्रहित पुस्तकाचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धनाजी पाटील यांनी कोकण विभागातील शिक्षक मतदार संघात आलेले विविध अनुभवांचा गोषवारा सादर केला. सध्या शिक्षकांमधून केवळ शिक्षकी पेशात कार्य असणाराच प्रतिनिधी विधान परिषदेवर प्रतिनिधी म्हणून निवडून दिला जावा या मताने जोर पकडला आहे.
शिक्षक भारतीनेही सुमारे 35 वर्षे एवढा शिक्षक चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या धनाजी पाटील यांच्यासारख्या जेष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिक्षकांच्या विचाराला रीतसर पाठिंबा पाठबळ दिले आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातून उत्स्फूर्त पाठिंबा धनाजी पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागल्याचे चित्र सर्वत्र आहे.
त्यामुळे शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान या सभेच्या वेळी धनाजी पाटील आणि संजय वेतुरेकर यांनी शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यपद्धती विषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तरपणे माहिती दिली.
सर्व तालुक्यातील शाळा मधून पात्र असलेल्या सर्व शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी फॉर्म सादर केला जाईल याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर