
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आदिवासींच्या विविध समस्या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना निवेदन..।!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
आदिवासी दुर्लक्षितच !आदिवासींच्या विविथ समस्यांबाबत लोकसभा अध्यक्षांकडे साकडे ..!
पुणे: दि.28/9/2022 .मूळ भारतीय लोक म्हणजे आदिवासी समाजाच्या आजही अनेक समस्या प्रलंबित आहेत ,त्यातील काही मानवाच्या मूलभूत गरजा पासून देखील वंचित राहावे लागते आहे . आदिवासी बांधवांच्या अनेक समस्याविषयी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची राजभवन पुणे येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांनी भेट घेऊन आदिवासींच्या विविध समस्या मांडल्या आहेत.
काय आहेत त्या आदिवासींच्या विविध समस्या..
1) महाराष्ट्र राज्यात 5 वी अनुसूचीची अंमलबजावणी करण्यात यावी.
2) मरांग गोमके जयपालसिंह मुंडा यांचा इतिहास देशातील प्रत्येक राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात घेण्यात यावा.
3) आदिवासींची स्वतंत्र जनगणना करून आदिवासी धर्मकोड 7 लागू करण्यात यावा.
4) देशातील प्रत्येक राज्यात आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.
5) अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर जमिनींचे हस्तांतर थांबवून पीडित आदिवासींना न्याय मिळावा.
6) दि 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने खऱ्या आदिवासींच्या बोगसानी बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करावी यासंदर्भात निकाल दिलेला असून परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करुन महाराष्ट्र शासनाने अद्यापही निकालाची अंमलबजावणी केलेली नसून त्या निकालाची अंमलबजावणी करावी.
7) *महाराष्ट्र राज्यातील आदिवासींची 2017 ची रखडलेली विशेष पदभरतीची अंमलबजावणी करण्यात यावी.
8) *महाराष्ट्र राज्यातील कसत असलेल्या गायरान व वनजमिनी आदिवासींच्या नावावर करण्यात याव्यात.
*9) *महाराष्ट्र राज्यातील काही गाव 100 टकके आदिवासी असूनही तेथे सरपंच आदिवासीच असतो परंतु ते आदिवासी गावे शासनाच्या सर्वेक्षणातून पेसा कायद्या पासून वंचित राहिलेले आहेत तरी त्या गावांचा पुन्हा सर्वेक्षण करून पेसा कायद्यात समावेश करावा.
10) दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यासाठी यु पी एस सी च्या तयारीसाठी प्रशिक्षणाची व वस्तीगृहाची निर्मिती करावी.
11) संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची संपूर्ण देशात शासकीय सुट्टी जाहीर करावी.
12) भारतीय सैन्य दलामध्ये आदिवासी बटालियन तुकडी स्थापन करावी.
13) *आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या नावावर आदिवासींच्या जमिनी व राजकीय आरक्षण व नोकरी आरक्षण चा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात इतर समाजाकडून होत असून त्यामुळे आदिवासी आरक्षण धोक्यात आलेले असून ज्या आदिवासी मुली बिगर आदिवासी मुलासोबत लग्न करतील त्यांच्या आदिवासींच्या आरक्षित सवलती तात्काळ बंद कराव्यात.
14) *आदिवासींची रूढी परंपरा चालीरीती आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या आदिवासी कलाकारांना मासिक मानधन मिळावे.
15) *आदिवासी स्वतंत्र धर्म असल्याने आदिवासींचे मोठ्या प्रमाणात होणारे इतर धर्मात धर्मांतरण रोखण्यासाठी सक्षम कायदे बनवावे व धर्मांतरण करणाऱ्यांच्या सवलती रद्द कराव्या.
16) *अनुसूचित क्षेत्रातील गौण खनिजांचा कर हा स्थानिक ग्रामपंचायतींना मिळावा.
17) महाराष्ट्र राज्यातील सह्याद्रीमध्ये इंग्रजांकडून आदिवासींवर होणार्या अन्याया विरुद्ध रक्तरंजीत क्रांती करून आदिवासींसाठी लढताना ठाणे कारागृहात जिवंत फासी मिळाली त्यामुळे नाशिक ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील कसारा घाटाला सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नामकरण करावे.
18) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील भाहुली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर असे नामकरण करावे.
19) मरांग गोमके जयपाल सिंह मुंडा यांना भारतरत्न मिळावा.
20) केंद्र शासनाच्या सर्व विभागातील आदिवासी कोट्यातील रिक्त जागांची पदभरती करण्यात यावी.
21) *महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व विभागातील पेसा पदभरती करण्यात यावी.
22) *महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा शिक्षक पदभरती करण्यात यावी .
23) केंद्र सरकारने 5 राज्यात 12 जातींचा आदिवासी जमातीत समावेश केलेला आहे त्या धरतीवर धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश करण्यात येऊ नये या सर्व विषया संदर्भात निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या सर्व आदिवासी समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत . लोकसभा अध्यक्ष.ओम बिरला हे सध्या पुणे दौऱ्यावर असून आज दिनांक 28 रोजी ते पुणे येथे भेट घेतली आहे . त्या वेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे महाराष्ट्र.प्रदेश युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांनी भेट घेऊन आदिवासींच्या विविध समस्या मांडल्या आहेत, असे त्या वेळी म्हणाले .
लकीभाऊ जाधव. महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली.
Total Users : 10828