ji24news

आदिवासी युवा श्री.ओमकार खोरगडे व श्री.सुरज पाटील यांच्याकडून एकलव्य अथॅलेटिक्स क्लब जव्हारला क्रीडा साहित्याची मदत….!

आदिवासी युवा श्री.ओमकार खोरगडे व श्री.सुरज पाटील यांच्याकडून एकलव्य अथॅलेटिक्स क्लब जव्हारला क्रीडा साहित्याची मदत,

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

मोखाडा ,प्रतिनिधी, सौरभ कामडी

 जव्हार स्टेडियम येथे एकलव्य अथॅलेटिक्स क्लबमध्ये मॅरेथॉन व अथॅलेटिक्सच्या सरावासोबतच जव्हार तालुक्यातील विविध आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय लेव्हल पर्यंत खेळाडू म्हणून मजल मारलेल्या पालघर जिल्ह्यातील १५ आदिवासी मुलामुलींना सरावासाठी बुट नसल्याची व परिणामी बऱ्याच वेळा मुलामुलींना सराव करताना तसेच स्पर्धेत धावत असताना इजा होत असल्याची खंत प्रशिक्षक श्री. शंकर चौधरी सर यांनी पनवेल मॅरेथॉनमध्ये पनवेल येथे सिडको अग्निशमन सेवेत सेवा बजावत असणारे आदिवासी युवा श्री. सुरज पाटील सर यांना सांगितली असता त्यांनी नुकतीच MPSC मधून उप विभागीय जल संधारण अधिकारी गट अ पदी निवड झालेले व विद्यमान मुंबई महानगर पालिकेत जल अभियंता म्हणून कार्यरत असलेले आदिवासी युवा श्री. ओमकार खोरगडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी रनींगसाठी उपयुक्त बुट दिले तसेच सिडको अग्निशमन सेवेत कार्यरत असलेले श्री. सुरज पाटील सर यांनी टीशर्ट, सॅन्डो, तसेच रनिंग साठी उपयुक्त पॅन्ट हे साहित्य दिले.

याप्रसंगी आदिवासी समाजसेवक श्री. दीपक कोथे व श्री. वैभव बरफ हे सुद्धा उपस्थित होते. या प्रसंगी श्री.ओमकार खोरगडे साहेब व सुरज पाटील सर यांनी उपस्थित मुलांना राष्ट्रीय खेळाडू म्हणून असलेल्या युवकांना शासकीय नोकरीतील संधी विषयी मार्गदर्शन करत ग्रामीण भागातून पुढे जात आपल्या आदिवासी समाजा सोबतच जिल्हाचे नाव उज्ज्वल करून भविष्यात देशासाठी खेळण्यासाठी शुभेच्छा देत यापुढे सुद्धा कोणतीही मदत व सहकार्य लागल्यास करण्याचे आश्वासन दिले. मॅरेथॉन तसेच अथॅलेटिक्सची सराव करण्यासाठी उपयुक्त बुट – मोजे, सोबतच टीशर्ट-सॅन्डो, तसेच धावण्यासाठी उपयुक्त पॅन्ट (टाइटी) यांची उपलब्धता करून दिल्याबद्दल एकलव्य अथॅलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक श्री. शंकर चौधरी सर यांनी सर्वांचे आभार वेक्त केले. 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर