ji24news

कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व..।!

कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व..।!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ असंही म्हटलं जातं.

नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते.
संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मात्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामध्ये एक साम्य आढळलं ते म्हणजे मसाला दुध किंवा खीर. आपणही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की, आपल्यालाही पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे मसाला दुध. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, कोजागिरीला मसाला दुधचं का पितात, इतर काही का नाही. याचं कारण जर तुम्हालाही माहित नसेल, तर ते जाणून घ्या.
चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवण्याचं कारण
आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दुध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दुध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं.
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व
आज कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, पुरातन काळात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं म्हटलं जातं. याच दिवशी समुद्र मंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली, त्यामुळे या दिवशी श्री लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. तर दुसऱ्या कथेनुसार, या दिवशी वृंदावनात श्रीकृष्ण भगवान यांनी राधा आणि इतर गोपिकांसोबत रासलीला केली होती. त्यामुळे यादिवशी रासगरबाही खेळला जातो.
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पिण्यामागचं कारण?
महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घ्या. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होतं असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याचा दुधातून मिळते.
यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदाक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात.

                                                                                                                                   संकलन :हेमंत घाटाळ 

 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर