ji24news

जनता दल यूनाटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती…..!

जनता दल यूनाटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती..।!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

दि. 18 ऑक्टोबर 2022 –
 बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यूनाटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील पक्षनेते खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांनी आज ही नियुक्ती केली.

नीतीश कुमार यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा कपिल पाटील त्यांच्या सोबत होते. कपिल पाटील हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त असून महाराष्ट्रातील समाजवादी विचारांचे एकमेव आमदार आहेत. समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्याला मिळालेला हा मोठा सन्मान आहे.

मुंबईतील शिक्षकांचे ते विधान परिषदेत सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करीत आहेत. शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी त्यांनी विधिमंडळ आणि रस्त्यावर आवाज उठवला. वंचित, पीडितांच्या प्रश्नावर लढणारे नेते म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.

देशभरातील समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, संस्था यांच्याशी त्यांचा निकटचा संपर्क आहे. मंडल आयोग चळवळ, ओबीसी चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. छात्र भारती, गांधी – आंबेडकर फाउंडेशन, नवनिर्माण शिक्षण संस्था आणि शिक्षक भारती यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.

आमदारांना दिलेल्या राजयोग सोसायटीतील घर त्यांनी नाकारले. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातही ते काही काळ होते. धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांबाबत कधीही तडजोड न करणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. तरीही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

सर्व  वंचित समाजाच्या  तसेच तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे   माननीय कपिल पाटील साहेब आणखी उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने काम करतील यात शंका नाही .असा सर्वस्तरावरती आपले सर्वांचे लाडके आदरणीय शिक्षक आमदार श्री कपिल पाटील यांची जनता दल युनायटेड पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती(National General Secretary) झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन… व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा …

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर