
जिल्हास्तरीय भुमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा,एकच ध्यास , बालकांचा सर्वांगिण विकास..।!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर .राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प मान्य कृती आराखडा सन २०२२-२३ नुसार लोकसंख्या शिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात कळविले आहे. कृती आराखडा घटक क्र.४. नुसार Curricular Activities दोन्ही स्पर्धा या जिल्हास्तर , राज्य व राष्ट्रीय स्तरावर पार पडणार आहेत. या प्रमाणे जिल्हास्तरावरील स्पर्धा आज संपन्न झाल्या .
आजच्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थी यांनी भुमिका अभिनय या गटात ,निरोगी वाढ,पौष्टिक आहार,वैयक्तिक सुरक्षा ( शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक),इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता, अंमली पदार्थाचा गैरवापर, त्याची कारणे आणि प्रतिबंध या विषयावर तर लोकनृत्य या गटात मुले व मुलींसाठी समान संधी, मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका,पर्यावरण संरक्षण (प्रतिबंध, कमी करणे, पुर्नवापर आणि RECYCLE),मादक द्रव्यांचे सेवन रोखणे,पौगंडावस्थेतील निरोगी नातेसंबंध अशा विविध विषयावर आपली कला सादर करून उपस्थितांची व परीक्षकांची मने जिंकली .
स्पर्धेचा निकाल : –
१) भुमिका अभिनय स्पर्धा : –
प्रथम क्रमांक: –
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ,जव्हार
द्वितीय क्रमांक : –
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ,तलासरी
तृतीय क्रमांक : –
जि .प . शाळा नेहरू हिंदी विद्यालय ता .वसई
२) लोकनृत्य स्पर्धा : –
प्रथम क्रमांक: –
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ,तलासरी .
द्वितीय क्रमांक : –
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ,विक्रमगड .
तृतीय क्रमांक : –
जि.प .शाळा गूहीर ता .वाडा
आयोजक : –
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , पालघर,शिक्षण विभाग (प्राथ. माध्य) जि .प .पालघर .प्रेरणास्थान .मा.श्री . सिध्दाराम सालीमठ साहेब .( भा.प्र.से ),( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि .प .पालघर ) मार्गदर्शन तसेच आदरणीय मा . श्रीमती . संगीता भागवत मॅडम .( प्राचार्या DIET तथा शिक्षणाधिकारी प्राथ ./माध्य जि .प .पालघर )
या स्पर्धेसाठी श्री. सतीश शेट्टी ( जनरल मॅनेजर ,सेंट जॉन इंजिनिअरींग , पालघर ) व श्रीम .सूचिता घरत मॅडम ( प्रिन्सिपल , सेंट जॉन इंजिनिअरींग , पालघर )प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होत्या . तसेच श्री.ढवळे सर (केंद्रप्रमुख ,नांदगाव तर्फे मनोर ) हे ही उपस्थित होते .या स्पर्धेचे श्री. भरत पांडे सर , श्री. दिपेश जाधव सर , श्रीम .सपना बाणे मॅडम यांनी उत्तम असे परीक्षण केले .भुमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा या दोन्ही प्रकारात प्रत्येक तालुक्यातील प्रथम विजेते अशा १६ संघांनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रचिती तरे मॅडम (BRC पालघर ) व आभार प्रर्दशन श्री. डि .के .संख्ये सर (BRC पालघर ) यांनी केले .निपुण भारत अभियान “
Total Users : 10829