ji24news

महावितरण विभागाच्या उप कार्यकारी अभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक ..।!

महावितरण विभागाच्या उप कार्यकारी अभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक ..।!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

वाडा : महावितरण  विभागाच्या उप कार्यकारी अभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली (ACB of palghar arrested him red handed while accepting a bribe of one lakh rupees) असून सामान्य जनतेला प्रचंड त्रासदायी असलेल्या या अधिकाऱ्या विरोधात झालेल्या या कारवाईने तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महावितरण विभागाच्या वाडा उप कार्यकारी अभियंत्याला  कंत्राटदाराकडून एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
पालघर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून वाडा पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. वाडा तालुक्यातील गोरगरीब जनतेला अवाजवी बिले देउन त्यांना प्रचंड मनस्ताप देणाऱ्या या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईने जनतेने समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईत पालघर विभागाचे पोलीस उप अधिक्षक नवनाथ जगताप, पोलीस उप निरीक्षक स्वपन बिस्वास, हवालदार संजय सुतार, विलास भोये, निशा मांजरेकर,अमित चव्हाण, नवनाथ भगत, सखाराम दोडे आदी सहभागी होते

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर