ji24news

२५ तारखेला दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण….!

२५ तारखेला दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )


मंगळवार दिनांक २५ रोजी दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल.

खगोलीय भाषेत सांगायचे झाले तर ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ त्यामुळे ग्रहणात घाबरून जाण्याचे कारण नाही. तर या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा असं आवाहन आम्ही आमच्या अनुजा अवकाश निरीक्षण केंद्रा मार्फत करत आहोत.

सदर सूर्यग्रहण मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांपासून सूर्यास्त होईपर्यंत पाहता येईल. सूर्यग्रहण असल्याने ते उघड्या डोळ्यांनी पाहू नये तर योग्य त्या साधनांचा वापर करावा जसे ग्रहण चष्मे ,सोलर फिल्टर ,वेल्डिंग काच ई. साधन उपलब्ध असली तरी ग्रहण सलग पाहू नये.

ग्रहण काळात कोणत्याही प्रकारचे उपास , व्रत करण्याची आवश्यकता नाही. कारण या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची सोय आमच्या केंद्रात आहे.

-चंद्रकांत घाटाळ
(संचालक – अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा )

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर