
तुषार दिवाळी अंक २०२२ आणि इतर पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अण्णाभाऊ साठे वर्तक सभागृह (काँग्रेस भवन), पारनाका, वसई येथे सदर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दिग्गज लेखकांनी आपल्या पुस्तकांचे प्रकाशन केले.या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवर लेखकांनी व नव लेखकांनी आपल्या पुस्तका बद्दल मनोगत व्यक्त करून संबंधित पुस्तकाचा गर्भितार्थ सांगितला प्रत्येक वाचकाने पुस्तक का वाचावे याचा मातीतार्थ सांगितला यात दुग्धशर्करा योग असा की आमच्या बोरशेती गावातील श्री.संतोष रामचंद्र जाधव यांचाही सहभाग होता.
यांच्या माणूस असल्याच्या जाणिवेतून – सृजन या चित्रकाव्य पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात साहित्य क्षेत्रातला एक नवा प्रयोग पाहायला मिळाला.
तो असा की, एका चित्राची निवड करून त्याखाली त्या चित्रातील भाव प्रदर्शित करण्याऱ्या कवितांच्या ओळी योजण्यात आल्या आहेत.मला अभिमान वाटतो की साहित्य क्षेत्रातला असा नव प्रयोग करणारा कवी आमच्या बोरशेती गावातील आहे.
उदाहरणार्थ – एक मानवी डोळ्याचं चित्र आहे त्या डोळ्याच्या बुबुळावर आपल्या भारत देशाचा तिरंगा अंकीत आहे.या चित्राला आधारित कवी पुढील ओळी लिहीतो.
*’डोळ्यात भारत दिसतो
मेंदुत स्वधर्म साचतो
जातीचं अध्यात्म वाचतो
मातीत हिरवं पिक साठवतो…
निळ्याशार आभाळाखाली
तांबड्या – केशरी सूर्याच्याच साक्षीने
मी अखंड भारत डोळ्यात साठवतो…!’*
अशा प्रकारच्या शंभर कवितांचा संग्रह या चित्रकाव्य पुस्तकात आहे. या काव्य संग्रहात अनेक मानवी भावभावनांचे दर्शन तर होतेच शिवाय मानवाच्या उत्क्रांतीला लाभदायक एक प्रबोधनात्मक संदेशही मिळतो.प्रत्येक वाचकाने हा संग्रह विकत घेऊन वाचावा व संबंधित कवीला पुढील नवनिर्मितीसाठी सहकार्य करून प्रोत्साहन द्यावे असे वाटते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कलाक्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले ‘भालजी पेंढारकर’ यांचे नातू श्री. आनंद पेंढारकर सर( गितकार, संगीतकार व साहित्यिक), श्री.प्रवीण शेट्टी साहेब ( महापौर वसई विरार म.न.पा.) श्री.मंदार भानुशे सर (विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा प्रमुख दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ) त्याचप्रमाणे श्री.रोशन कापसे साहेब (पुरवठा अधिकारी) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तुषार प्रकाशनचे संपादक श्री. डॉ. अरुण घायवट सर,सहसंपादिका अनिता घायवट, संध्या गायकवाड, स्वाती भोईर, आणि दीपक बडगूजर यांनी केले होते.
प्रतिनिधी….
श्री.अविनाश धर्मा वेखंडे
श्री सचिन शेलवले
Total Users : 10829