
आदिवासी गायक बाळ्या यांच्या मृत्यूने गाण्यातील बुलंद आवाज हरपला…
जोहार इंडिया न्यूज 24 प्रतिनिधी – शहापूर
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘आग पोरी तू स्वप्नात ये ना ‘ फेम प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे उर्फ बाळ्या सिंगर यांचा मृत्यू झाला आहे. रोजगाराचा प्रश्न न सुटल्याने कुटुंबाच्या पालन- पोषणासाठी मासेमारी करताना पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मृत्यूचं कारण मात्र अद्यापपर्यंत समजलेलं नाही. बाळा यांच्या पश्चात 4 मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.बाळा गुरुवारी रात्री सोनुभाऊ बसंवत कॉलेज जवळील पळसपाडा इथल्या नदीवर ते मासेमारीसाठी गेले होते. सकाळी त्यांचा मृतददेह नदीकिनारी तरंगताना आढळला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
कायम मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होऊ शकतो ? अशी शंकाही नेटकऱ्यांनी व्यक्त केलीय जात आहे.
बाळ्या सिंगर जरी आमच्यात नसला तरी ते कायम गाण्याच्या माध्यमातून आमच्या चाहत्यांच्या मनात राहील अशा काही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने दिल्या आहेत.
दरम्यान आदिवासी समाजातील बाळ्या सिंगरने मासेमारी करत आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बाळ्या सिंगर ‘आग पोरी तू स्वप्नात ये ना’ या गाण्यामुळे घराघरात पोहचला होता.
Total Users : 10829