ji24news

मृत्यूचं तांडव घडूनही पुन्हा उभं राहतं हे शहर, पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीचा इतिहास…..!

मृत्यूचं तांडव घडूनही पुन्हा उभं राहतं हे शहर, पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीचा इतिहास ….!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )हमदाबाद

हमदाबादः गुजरातमध्ये  रविवारी संध्याकाळी मोरबी शहरातील पूल कोसळल्याने (Morbi Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली.

यात जवळपास 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. पण अचानक एवढे मृत्यू ओढवल्याने गुजरातमधील मोरबी हे शहर अचानक बातम्या आणि चर्चांच्या केंद्रस्थानी आलंय.
या निमित्ताने मोरबी शहराचा इतिहासही धुंडाळला जातोय. जुन्या घटना आणि वर्णनांमध्ये डोकावून पाहिलं असता, मृत्यूचं हे तांडव मोरबी शहरानं या आधीही पाहिलं अन् पचवलंही असंच दिसून येतेय. सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचा इतिहास तेवढाच चढ-उतारांचा आहे.
1879 ते 1948 दरम्यान हे शहर वसवण्यात आलं, असं मानलं जातं. त्यावेळी राजा वाघ याने नेहमीच प्रजेला केंद्रस्थानी ठेवून शहराची निर्मिती केली. रस्ते, रेल्वेमार्ग निर्मिती करताना आधुनिक विकासाची कास धरली.
कपडे आणि मीठाची निर्यात करण्यासाठी येथे नवलखा आणि ववानिया या दोन बंदरांची निर्मितीही करण्यात आली. मोरबीचं रेल्वे स्टेशन स्थापत्य शैलीचं अनोखं उदाहरण आहे. युरोपीय स्थापत्य कलेचा प्रभावही येथे दिसून येतोय
सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर नदी किनारी वसलेलं आहे. त्यामुळे आजू-बाजूच्या शहरांसाठी मोरबी नेहमीच आकर्षण केंद्र ठरलंय. याच शहराच्या मध्यभागी आहे हँगिंग ब्रीज अर्थात झुलता पूल.

मोरही हे शहर लंडनच्या धर्तीवर वसवण्यात आलं होतं. मोरबीचा झुलता पूल लंडनमधील रिव्हरफ्रंटची आठवण करून देतो. राजकोटपासून जवळपास 60 किमी अंतरावर मोरबी आहे. पण इथल्या इमारती 19 व्या शतकातील युरोपची आठवण करून देतात. नदी किनारी झालेल्या आधुनिक पद्धतीच्या विकासामुळेही हे जास्त प्रसिद्ध आहे.
मच्छु नदी किनाऱ्यावरील जो झुलता पूल कोसळला. तिथे यापूर्वी एकदा पूरानं थैमान माजवलं होतं. 11 ऑगस्ट 1979 रोजी अतिवृष्टीमुळे पूर आला. मच्छू धरण फुटलं. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील संपूर्ण शहर पुरात ओढलं गेलं. अनेक घरं पडली. या भयंकर घटनेत तब्बल 1439 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 12 हाजारांपेक्षा जास्त प्राण्यांचा मृ्त्यू झाला होता.
असं भयंकर मृत्यूचं तांडव पचवल्यानंतर मोरबी पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर चालत उभं राहिलं. सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी लोकप्रिय झालं. अजंता क्वार्ट्जसारख्या कंपन्यांनी इथे बस्तान बसवलं. टाइल्स व्यापारही फोफावला. एका अहवालानुसार मोरबीत 390 सिरॅमिक आणि 150 भिंतीवरील घड्याळ्याच्या कंपन्या आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर