ji24news

मोखाडा तालुक्यातील पिंपळपाडा ते घानवळ रस्त्याची प्रचंड दुरावस्था…!

मोखाडा तालुक्यातील पिंपळपाडा ते घानवळ रस्त्याची प्रचंड दुरावस्था…

जोहार इंडिया 24 न्यूज
मोखाडा ग्रामीण प्रतिनिधी.
मोखाडा – मोखाडा तालुक्यातील पिंपळपाडा ते घानवळच्या दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावरील डांबराचा थरच गायब झालेला आहे. त्यामुळे दोन किलोमीटरच्या घाट रस्त्यावरील नागमोडी वळणे अत्यंत धोकादायक बनली आहेत.
राज्य महामार्ग डहाणू – नाशिक च्या मोखाडा तालुक्यातील पोशेरा आणि मोरचोंडी पासून फाटा फुटून हा रस्ता पालघर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. तसेच मोखाडावासियांना हरसूल आणि पेठ या प्रमुख बाजारपेठांना देखील जोडणारा अत्यंत जवळचा आणि प्रमुख मार्ग आहे.त्यामुळे या रस्त्याला मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र पिंपळपाडा ते घानवळ जवळील जांभूळमाथा फाट्यापर्यंतच्या या दोन किलोमीटरच्या घाट रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वारांचे अपघात देखील घडत आहेत.
या दुरावास्था झालेल्या रस्त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतील असा प्रश्न या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
या रस्त्याने मूलभूत सोयींसाठी असणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, रेशनच्या शिधा वाटापाची गाडी आणि रुग्णवाहिका अशा वाहनांची नेहमीच ये – जा असते.त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी,वाहचालक व सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर