
आदिवासी वारली समाज उन्नती मंडळ – मोखाडा आयोजित गुणवंत सत्कार व सामाजिक,सांस्कृतिक समाज शिपाई प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज
मोखाडा ग्रामीण प्रतिनिधी – सचिन वझरे.
गांधींपुल दि.6 रोजी आदिवासी वारली समाज उन्नती मंडळ – मोखाडा आयोजित गुणवंत सत्कार व सामाजिक,सांस्कृतिकदृष्ट्या वारली समाजात महत्वपूर्ण असेलेल्या शिपाई पदाचे प्रशिक्षण गांधींपुल येथील नंदिकेश्वर महादेव मंदिर येथे उत्साहात संपन्न झाले.
हे गुणवंत सत्कार व शिपाई प्रशिक्षण कार्यक्रम आदिवासी वारली समाज उन्नती मंडळाचे सल्लागार श्री.अशोक बात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी वारली समाजाचे आराध्य व कुळदैवत हिरवा देव करंडी प्रतिमेच्या पुजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाशजी निकम साहेब यांनी उपस्थित वारली समाज बांधव व गुणवंताना मौलिक मार्गदर्शन करून वारली समाजाच्या हितासाठी मी चोवीसतास उपलब्ध असून खेळाडू,गुणवंत,कलाकार यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठेही कमी पडू नये म्हणून कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात १)नरेश वांगड पोलिस भरतीची तयारी करणारे आणि मुलांची तयारी करून घेणारे श्री.नरेश वांगड,उत्कृष्ट धावपट्टू – मनोज हीलीम,प्रतिक धनगरे, माणिक वाघ, विजय वाघ आणि स्केटिंग खेळातील सुवर्ण पदक विजेत्या कु.दक्षतनया रामदास गाडर,उत्कर्षा रामदास गाडर यांना वारली समाज उन्नती मंडळ – मोखाडा यांच्यावतीने ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक तर जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाशजी निकम व सौ.सारिका प्रकाश निकम यांच्या कडून रोख पारितोषिक आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.तसेच धावपटटुंकरिता लागणारे स्पाईक बूट देण्याची हमी देखील श्री.प्रकाशजी निकम यांनी घेतल्यामुळे समाजबांधव आणि खेळाडू यांच्यामध्ये आनंदाची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सोमा तुंबडे, मोखाडा तालुका अध्यक्ष – श्री विलास गिरंधले साहेब, भास्कर भोवर सर, गणेशजी ठाकरे लाभले होते तर कार्यक्रमास खाडम बाबा,कृष्णाजी खरपडे,गणेश गडगे,भोवर बाबा,रामदास थाळेकर,बापू बुधर,मकरंद बात्रे,नंदा भोये,चंद्रकांत मोहंडकर,रमेश घाटाळ यांच्याबरोबर अनेक समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी भोजन व्यवस्था गंगाराम वांगड,लक्ष्मण शिंगाडे,अनंता दोधाड,विलास गिरंधले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भालचंद्र धनगरे सर यांनी केले तर आभार सचिव श्री.हेमंतजी शिंगडे यांनी मानले.

Total Users : 10829