ji24news

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारजी यांना आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादर…..!

रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारजी यांना आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादर……!..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
आज दि. १०/११/२०२२ .वाडा येथील आदिवासी कातकरी समाजाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहले हे आम्ही आमचे भाग्य समजतो,पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध मुलभुत प्रश्नांबद्दल यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ….


१) संविधानाच्या ५ व्या व ६ व्या अनुसूचिनुसार मा. राज्यपाल म्हणुन आपणांस अनुसुचित क्षेत्रासंदर्भात स्वतंत्र अधिकार प्राप्त आहेत म्हणुन पेसा कायद्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासंदर्भात आपली भुमिका महत्वाची आहे .आज पेसा कायद्याची अनुषंगाने सरकारी यंत्रणा काम करत आहे,सरकारी यंत्रणेऐवजी गाव म्हणुन स्वयंपुर्ण होवुन सक्षमपणे गावाने कारभार करावा या दृष्टीने पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणुन आपणाकडुन राज्य सरकारला निर्देश देवुन कार्यवाही व्हावी.
२) आदिम कातकरी समाजाच्या रोजगाराकरीता होणारे स्थलांतर रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आपण पुढाकार घेवुन राज्य सरकारला निर्देश द्यावेत.
३) पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात दरवर्षी होणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत.
४)पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजात सुशिक्षित युवक – युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे,त्या करीता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन पालघर जिल्ह्यात पेसा कायद्यानुसार स्थानिक आदिवासी युवक – युवतींची नोकरभरती करावी.
५) महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आदिवासी संघटनेचे नेते तसेच आदिवासी समाजाचे आजी – माजी आमदार – खासदार असुन आदिवासी आढावा समितीच्या अध्यक्षपदी आदिवासी समाजातील व्यक्तींचीच नियुक्ती करावी,
या मागणयांबाबत आपण जातीने लक्ष देवुन सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.!

 अध्यक्ष -अनंता वनगा.आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर