
वाकी गावातील तरुणांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड
9226991241
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आज रविवार दी.13/11/2022 रोजी वाकी येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना समोर ठेवून तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातुन वनराई बंधारा बांधला.
पावसाळ्यात पाणी पडल्यावर वाहून जाते.परिणामी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होते यावर कुठे तरी मात व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे. या पाण्याचा उपयोग गाई- गुरांना, पशूपक्षांना, जनावरांना पिण्यासाठी तसेच नागरिकांना धुण्याभांड्या साठी वापर व्हावा त्याचप्रमाणे हे पाणी वाहत न जाता ते जमिनीत मुरावे आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी हा वाकी येथील तरुणांनी पुढे येऊन केलेला छोटासा प्रयत्न.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, भूषण महाकाळ, यतिन मिसाळ, अविनाश महाकाळ, स्वप्निल मिसाळ, चेतन महाकाळ, ऋतीक टोपले आदि तरूण उपस्थित होते.
Total Users : 10829