
वाडी वस्तीत शिक्षक विक्रमगड तालुक्यात आजपासून ‘निपुण महाराष्ट्र’ उत्सव…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये विक्रमगड mob no 922699124
बाल दिनाचे औचित्य साधून विक्रमगड येथे निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत 14 ते 20 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवा अंतर्गत विक्रमगड येथील प्रत्येक वाडी वस्तीवरील माता गटांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून मुलांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विषयी होत असलेल्या प्रगती त्यामध्ये येणारे नवीन अनुभव यांची माहिती शिक्षकांकडून घेतली जाणार आहे सोमवारी बाल दिनाच्या निमित्ताने साक्षरता व संख्याज्ञान भक्कम करण्यासाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबवला जात आहे. पंचायत समिती अंतर्गत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग माता गटांना भेटी देणार आहेत यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचवला जाणार आहे निपुण भारत अंतर्गत माता गट भावरपाड़ा येथे पंचायत समिति विक्रमगड येथील निपुण भारत अंतर्गत तालुका नोडल अधिकारी सौ. हृषिता कोरे आणि गुरु तिरणकर यांनी निपुण माता गट भेटी देऊन माताना निपुण भारत अंतर्गत मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी समजनु घेऊन त्यांना योग्य ते माहिती देऊन आपल्या मुलांना सोप्या पद्दतिने विडियो बघुन शिकवन्यास निपुण माताना प्रोसहित केले.

Total Users : 10829