
यारी दोस्ती ग्रुप कडून वाडा तालुक्यात शैक्षणिक उपक्रम आणि गरजूंना चादर वाटप कार्यक्रम संपन्न…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये.विक्रमगड
दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त यारी दोस्ती फाऊंडेशन कडून वाडा तालुक्यात बोचलपाडा आणि मलावकर पाडा या दोन शाळेवर शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला आणि गरजू आजी-आजोबांना मायेची ऊब म्हणून चादरीचे वाटप करण्यात आले.
आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यासाठी, त्यांच्या विचारांची लहान मुलांना माहिती मिळावी म्हणून शाळेवर शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि यारी दोस्ती ग्रुप सदस्य यांनी सर्वांनी प्रतिमेला वंदन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यामधून प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार केला. त्यांनतर भगवान बिरसा मुंडा यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्य वाटप करण्यात आले.
बोचलपाडा या शाळेतील शिक्षिका सौ. अस्मिता ठाकरे आणि मुख्याध्यापिका सौ. संगिता पाटील मॅडम यांनी त्यांच्या शाळेत शैक्षणिक उपक्रम राबविण्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप चे खूप खूप कौतुक केले आणि पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच मलावकर पाडा या शाळेतील शिक्षक श्री. राजेंद्र पाटील यांनी देखील ग्रुपचे शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल आभार मानले.

Total Users : 10829