ji24news

सागर स्केटिंग अकॅडेमीचे बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सहभागी झालेले खेळाडू कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या माजी उपमहापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्या हस्ते सन्मानित…!

सागर स्केटिंग अकॅडेमीचे बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सहभागी झालेले खेळाडू कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या माजी उपमहापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्या हस्ते सन्मानित…

जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी –
टिटवाळा – दि.17 नोव्हेंबर रोजी स्केटिंग खेळातील एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स ,गोल्ड स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स ,इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स ,वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया,ग्लोबल जिनियस रेकॉर्ड्स मध्ये सहभागी झालेल्या स्केटिंग खेळाडूंचा सन्मान सागर स्केटिंग अकॅडेमीने टिटवाळ्यातील प्रथमेश हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या मा.माजी उपमहापौर सौ.उपेक्षाताई शक्तिवान भोईर मॅडम आणि मोहने मंडळ भाजप अध्यक्ष-श्री.शक्तिवान भोईर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्रॉफी,मेडल्स आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा स्केटिंग खेळातील विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. त्या इव्हेंट्समधील सहभागी खेळाडूंची ट्रॉफी,प्रशस्तीपत्रे आणि मेडल्स मिळताच सागर स्केटिंग अकॅडेमीच्या कुलदीप सागर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमधील प्रभावी व्यक्तिमत्व आणि माजी उपमहापौर सौ.उपेक्षाताई शक्तिवान भोईर यांना कार्यक्रमास निमंत्रित केले होते. या कार्यक्रम प्रसंगी श्री.शक्तिवान भोईर साहेब यांनी खेळाडू पालकांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष – सौ.उपेक्षाताई शक्तिवान भोईर यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच सागर स्केटिंग अकॅडेमीचे प्रशिक्षक श्री.कुलदीप सागर व दिपक सागर व हुसैन सर यांचा सन्मान करून स्केटिंग खेळाडूंना सर्वोत्कृष्ट घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे सूचित करून शुभेच्छा दिल्या. याशिवाय स्केटिंग अकॅडेमीस सहकार्य करणारे प्रथमेश हॉलचे संचालक श्री.कुणाल सर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सहभागी झालेल्या कु.दक्षतनया गाडर,उत्कर्षा गाडर,श्लोक घावट,प्रांजल कोकम,रुचिता कवठे,ऐश्वर्या नांदगावकर,नक्ष गायकवाड,शनाया बोरगावकर अर्णव कुलकर्णी आणि आराध्या सावंत या खेळाडूंना माजी उपमहापौर सौ.उपेक्षाताई शक्तिवान भोईर व शक्तिवान भोईर साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रामदास गाडर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.मयूर राऊत सर यांनी केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर