
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजापासून जल्लोषात सुरुवात…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजापासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली. 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत. निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Total Users : 10829