
शारदा माता मित्र मंडळाच्या मंदिराचे भूमी पूजन सोहळा कार्यक्रम संपन्न…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये विक्रमगड
हिंदू धर्मा मध्ये हिंदू संस्कृती कशी टिकेल या प्रयत्नाने महाराष्ट्रात 108 मंदिरे पूर्ण करण्याचा संकल्प श्री.तुकाराम डंबाळी महाराजांनी योजिले आहे .यापैकी दहा वर्षे पूर्ण झाल्या नंतर, सार्वजनिक शारदा माता मित्र मंडळ शेवते(सुतारपाडा-तांडेल पाडा) च्या जागेवर मंदिर उभारण्यासाठी भूमी पूजन कार्य हे श्री.तुकाराम डंबाळी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.तुकाराम डंबाळी महाराज व त्यांच्या टीमच्या वतीने हे बांधकाम त्यांच्या स्वयं: खर्चात पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले .या वेळी श्री.यशवंत कोदे वकिल साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं .या कार्यक्रमाला गावकरी ,नामदेव जाधव (पोलीस पाटील),ईश्वर जाधव , निलेश कोदे, प्रदिप तांडेल, जयेश सुतार,नरेश तुंबडा, मंडळाचे सदस्य उपस्थित होते .

Total Users : 10829