
आझाद मैदानात मच्छिमार, आदिवासी आणि शेतकरी यांनी नियोजित वाढवण बंदराच्या विरोधात प्रचंड मोर्चा …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
मुबई ;अदानीला जगातला सर्वात श्रीमंत उद्द्योगपती करण्यासाठी वाढवण बंदराचा घाट सत्तेतल्या मित्रांनी घातला आहे. ज्यांनी सर्वाधिक विटा अयोध्येला पाठवल्या त्या मच्छिमारांना वाढवणच्या बंदरात बुडण्याचा हा घाट आहे, अशी घणाघाती टीका जनता दल युनायडेटचे नॅशनल जनरल सेक्रेटरी आमदार कपिल पाटील यांनी आज केली.
आझाद मैदानात मच्छिमार, आदिवासी आणि शेतकरी यांनी नियोजित वाढवण बंदराच्या विरोधात आज प्रचंड मोर्चा काढला होता. त्यावेळी कपिल पाटील बोलत होते.

Total Users : 10829