
यारी दोस्ती ग्रुप कडून गरजू आजीला मदत…!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये .विक्रमगड
दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी, विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी खुर्द या गावातील नाव वंसी देवाजी शेदड (वय अंदाजे ८० वर्षे) या गरजू आणि वृद्ध आजीला यारी दोस्ती फाऊंडेशन कडून किराणा कीट आणि चादर देवून मदत केली.
सदर आजी या एकट्याच मोडक्या तोडक्या झोपडीत राहत असून त्यांचा पालन पोषण करण्यासाठी कुणीच नाही. या वृद्ध काळात आजीला जीवन जगण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे. या वृध्द आणि निराधार आजीला मदत करावी म्हणून स्थानिक सदस्यांनी तिच्या घरी जावून त्या आजीला जिवणाश्यक वस्तू म्हणून किराणा कीट आणि चादर देवून मदत करण्यात आली.
ही मदत यारी दोस्ती ग्रुप मधील मित्रांनी एकत्रित निधी गोळा करून निस्वार्थ भावनेने मदत केली. या मदती बद्दल यारी दोस्ती ग्रुपचे सदर आजींनी खूप खूप आभार मानले.

Total Users : 10829