
मोहो प्रीमियर लीग (MPL2022)जल्लोषात साजरा ….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )चेतन ठाकरे
विक्रमगड ;सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोहो प्रीमियर लीग अतिशय आनंदात,उत्साहात पार पाडला गेला. शीळ, मोहो बू. व मोहो खुर्द या तीन गावचे अनेक खेळाडू एकत्र येवून 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसामध्ये अतिशय चुरशीचे व अटीतटीचे क्रिकेटचे सामने नियोजन पद्धतीने खेळले गेले अनेक देणगीदात्यांनी या क्रिकेच्या सामन्यांना आकर्षक चषके तसेच अर्थसहाय्य देखील केले. तसेच अनेक घटकांनी या खेळाडूंना विविध मार्गांनी मदत केली. या तीन दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी या लीगला भेटी देवून येथील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.बक्षीस वितरणासाठी विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब सन्मा. श्री. प्रदीप गीते साहेब तसेच त्यांचे सहकारी,तिन्ही गावचे जेष्ठ नागरिक, गावातील अनेक सन्मानिय व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वांच्या हातून अनेक खेळाडूंना बक्षीस वितरण करून सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.या लीग मध्ये प्रथम पारितोषिक- शिवबाचे मावळे, द्वितीय पारितोषिक – पार्टनर इलेव्हन, तृतीय पारितोषिक- वीर मराठा, चतुर्थ पारितोषिक – आर.के आर, पाचवे पारितोषिक – सी. एस. लायन, सहावे पारितोषिक – राईझिंग स्टार यांना मिळाले,बक्षीस समारोपामध्ये सन्मा.श्री. प्रदीप गीते साहेबांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.तसेच श्री. चेतन ठाकरे सरांनी सर्व पाहुणे मंडळीचे,सर्व देणगीदात्यांचे ,ज्या सर्व घटकांनी खेळास मदत केली त्यांचे सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Total Users : 10828