
घर काम पूर्ण करून महिला घेतात दहावी पूर्ण करण्यासाठी शिक्षण….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दिपक भोये विक्रमगड
एलटीपीसीटी व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विक्रमगड तालुक्यामध्ये सेकंड चान्स उपक्रम चालू झाला आहे दरम्यान प्राथमिक शिक्षण गावोगावी उपलब्ध आहे परंतु आर्थिक सामाजिक व भौतिक परिस्थितीमुळे शिक्षणाची संधी घेता येत नाही अशा महिला व मुलींना प्रथम या संस्थेने इयत्ता दहावी पास होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे या उपक्रमांतर्गत आपल्या गावातील इयत्ता पाचवी पास ते नववी पास नापास पुढील शिक्षण घेण्यास इच्छुक महिलांना इयत्ता दहावीचा 17 नंबरचा फॉर्म भरून त्यांची इयत्ता दहावी पूर्ण करण्यास मदत करत आहेत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत मोफत पाठ्यपुस्तके, नोट्स मार्गदर्शन ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग फाउंडेशन कोर्स व मेन कोर्स या बाबी दिल्या जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावातील महिला व मुली यांना सक्षम बनवणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी जीवन कौशल्य व हेल्थ अँड हायजिन या विषयांची जोड दिली जाते.
या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिला व मुली या रोज घरातील सर्व कामे व शेतातील काही कामे करून वर्गाला येत आहेत. ज्या महिला व मुलींना कधी असे वाटत नव्हते की आपण पुन्हा शिक्षण घेऊ अशा मुली आता अभ्यासामध्ये उत्साह दाखवत आहे व रोज वर्गाला येऊन अभ्यास पूर्ण करत आहे.
दरम्यान अंकुश ठाकूर सर दिल्ली वरून, रोहन शिंदे सर मुंबई तर गणेश ढाने साताऱ्या वरून येऊन त्यानी वर्गाला भेट देऊन वर्गातील महिला व मुलींची चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करण्यास शुभेच्छा दिल्या व असेच निरंतर शिक्षण चालू ठेवण्यास प्रेरित केले

Total Users : 10829