
कऱ्हे तलावली ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दिपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्या कऱ्हे तलावली या ग्रामपंचायत मध्ये या 2021-2022 वर्षी निवड झालेले सरपंच, उप सरपंच ,सदस्य अशी निवड झाली. आज दिनांक 28/11/2022 या गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली येथे ही ग्रुप ग्राम सभा पार पडली. 2023 ते 24 या ग्रामसभेमध्ये मनरेगेचा आराखडा तयार करणे. रोजगार हमीची कामे, शबरी मधून आलेले घरकुल योजना, तंटामुक्ती अध्यक्ष नेमणूक, दिवाबत्ती कामे अशी अनेक प्रकारची कामाचे नियोजन करूनया ग्राम सभेमध्ये अनेक प्रकारची कामे आहेत ती त्यांनी त्याची नियोजन केली याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.आणि ही सभा ग्रामपंचायत कऱ्हे तलावली मधील सर्व ग्रामपंचयतमधील कर्मचारी ग्रामस्थ तसेच ग्राम सेविका सौ. सुलोचना लंगी, सरपंच श्री. दिलीप कोकेरा, उप सरपंच श्री. कल्पेश तुंबडा, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते

Total Users : 10829