
“लोक सहभागातून शाळेचा विकास”
हि संकल्पना राबवा – उपसभापती प्रदीप वाघ.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) मोखाडा -सौरभ कामडी.
खोडाळा भागतील विविध केंद्रस्तरावरील शिक्षण परीषदांना संबोधित करताना मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी शिक्षकांना आवाहन केले, की जनता व पालकांना बरोबर घेऊन लोक सहभागातून शाळेचा विकास साधला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
पाचघर शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी विशेष आयोजन करुन शिक्षण परिषद कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात घेतला. मुलांनी लेझीम पथक तयार करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच नरेंद्र येले, उपसरपंच परशुराम अगिवले व सदस्य यांनी शाळेला मोठ्या स्वरूपात क्रिडा साहित्य, सायकल व इतर बाबी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी विशेष कौतुक देखील केले. व यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वाकडपाडा केंद्राची शिक्षण परिषद कामडवाडी शाळेत पावरा सर यांनी आयोजन केले तसेच पाथर्डी केंद्राची शिक्षण परिषद पाथर्डी येथे युवराज पाटील यांनी परिश्रम घेऊन आयोजित केली होती. 
यावेळी उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच नरेंद्र येले, सरपंच लता वारे, उपसरपंच नंदकुमार वाघ, उपसरपंच परशुराम अगिवले, माजी उपसभापती शंकर भले, पत्रकार गणेश वाघ, युवा नेते अशोक वाघ, अंकुश वाघ, विस्तार अधिकारी नंदकुमार वाघ, रामचंद्र विशे, केंद्रप्रमुख ना.गु विरकर, संजय वाघ, पांडुरंग वारे, गणेश खादे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
Total Users : 10829