
शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुली प्रथमांकाने विजयी …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
विक्रमगड ;दि.26/11/2022 रोजी भारती विद्यापीठ स्कूल विक्रमगड येथे मुंबई विभाग शालेय तालुका स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत जि.प.उच्च. प्राथ. शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुली प्रथमांकाने विजयी झाल्या.त्याबद्दल भारती विद्यापीठ स्कूलचे प्राचार्य,आदरणीय श्री. अरविंद ठाकरे सर, आदरणीय श्री. लक्ष्मण सुतार सर,गवळी सर, विक्रमगड हायस्कूल चे शिक्षक तसेच जि.प.उच्च.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनोजे सर, प्रशिक्षक- श्री.संतोष गणपत उमतोल सर,शिक्षकव्रुद,सरपंच आदरणीय श्री.विलास गहला साहेब, उपसरपंच श्री.महेश खरपडे व ग्रामस्थ यांच्या कडून विजेत्या मुलींचे गोड कौतुक केले जात आहे.
Total Users : 10829