ji24news

सागरी हवामानाच्या माहितीमुळे जीवाचे संरक्षण- तुषार अरविंद मर्दे…

सागरी हवामानाच्या माहितीमुळे जीवाचे संरक्षण- तुषार अरविंद मर्दे..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दिपक भोये.
बाहेरून शांत भासणारा समुद्र कधी कधी अत्यंत रौद्र रूप धारण करतो.उदरनिर्वाहाच साधन म्हणून मासेमारी करणारे मासेमार बांधव सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जर तर अत्यंत महत्वाचे असतात . लहान बोट व कमी मनुष्यबळ आणि आधुनिक संवादाच्या साधनाची कमतरता , अशी यंत्रणा नसल्याने हे मासेमार सर्रास सागरी अपघातांना बळी पडतात.
डहाणू पालघर येथे राहणारे 42 वर्षीय तुषार अरविंद मर्दे यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मासेमारी हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आहेत. तुषार यांची स्वतची लहान फायबर ची होडी आहे व त्यावर 7 माचिमार कामाला आहेत . तुषार अरविंद मर्दे एक पारंपरिक मासेमार असून गेली 13 वर्ष मासेमारी करत आहेत . 2020 साली रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांशी काही कामानिमित्त तुषार यांची भेट झाली. त्यांनी स्वतः रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामानाच्या व्हाट्सप सेवेला जोडले गेले.
तुषार अरविंद मर्दे रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामान सेवेसोबत २ वर्षापूर्वी जोडले गेले. रिलायन्स फाऊंडेशन कडून माहिती मिळवायला सुरवात केल्यावर या महितीचा आणि प्रत्यक्ष समुद्रातील परिस्थितीचा ताळमेळ लावून ही सेवेचा उपयोग करायला सुरवात केली .
रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी हवामानाची माहिती व हवामानाची माहिती मिळवण्यापूर्वीचा मासेमारी व्यवसाय यातला फरक सांगताना तुषार म्हणतात, “ रिलायन्स फाउंडेशन यांनी आम्हाला सागरी हवामानाची माहिती देण्यास सुरू केली, परंतु अशी माहिती आम्हाला यापूर्वी कोठेही मिळत न्हवती. काही वेळेस व्हाटसप्प वर आम्हाला चुकीचे वादळाचे मेसेज यायचे त्यामुळे गैरसमज व भीती निर्माण व्हायची . परंतु आता रिलायन्स फाऊंडेशनकडून माहिती मिळायला लागल्यापासून आम्ही एक दिवस आधीच समुद्रामध्ये जायचं की नाही याचा निर्णय घेऊ लागलो.संभाव्य धोके टाळणे शक्य झाले. ज्या मासेमार्‍याना इंटरनेट किंवा मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येत नाही अश्यांसाठी तंत्रद्यानाच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी माहिती उपयुक्त ठरत आहे.
रिलायन्स फाऊंडेशनकडून वार्‍याचा वेग जास्त आहे किंवा हवामानाची परिस्थिति कधीही बदलू शकते अशी माहिती मिळते तेव्हा आम्ही मासेमारीसाठी जात नाही त्यामुळे आमचा वेळ,श्रम आणि जीवन तसेच अत्यंत महत्त्वाचे इंधन बचत होते. वार्‍याचा वेग अचानक बदलला तर बोट अर्ध्या मार्गातून परत घ्यावी लागते त्यामुळे डीझेलच नुकसान होत. एप्रिल 2022 ते नोवेंबर 2022 या 8 महिन्याचं विचार करता अंदाजे 10-12 वेळेस वादळाची शक्यता किवा उंच लाटा उटणार आहेत अशी सूचना मिळाली होती . अशा वेळेस आम्ही 5 वेळेस बोट समुद्रामध्ये मासेमारीसाठी नाही पाठवली त्यामुळे साधारणतः 45 000 ची बचत करता आली. एका फेरीस साधारणतः 5000 रुपयांचे डिसेल लागते , तसेच 2500-3000 रुपये बोटीवरील माछिमार यांना द्यावे लागतात व साधारणतः 2000 रुपये बर्फ प्रती दिवशी लागतो . रिलायन्स फाऊंडेशन व INCOIS यांचे आभार मानून ही सेवा अशीच अविरत चालू ठेवावी,अशी विनंती श्री.तुषार अरविंद मर्दे केली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर