ji24news

भारतीय संविधान व मानवाधिकार या विषयावर व्याख्यान…

भारतीय संविधान व मानवाधिकार या विषयावर व्याख्यान…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : वार्ताहर.
दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी.
वडणेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला.
महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ‘मानवाधिकार आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर, प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, मार्गदर्शक डॉ. गणेश बहादे, संयोजक डॉ. विनोद मुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
प्रास्ताविकात डॉ. सारिका चौधरी म्हणाल्या की लिंगावर आधारित पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्री आणि पुरुषांसाठी दोन चौकटी समाजामध्ये निर्माण झाले आहे आणि म्हणूनच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्यायालयीन या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत आहे परंतु मानवी अधिकारामुळे आणि भारतीय संविधानामुळे स्त्रिया अधिकाराबाबत जागृत होत आहेत व अनेक उच्च पदावर काम करत आहे अजूनही बऱ्याचश्या महिलांना मानवाधिकार मानवी हक्काबाबत माहिती नसल्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे विचार मांडले.
मानवी हक्क हे प्रत्येक व्यक्तीला जन्मताच नैसर्गिकरीत्या प्राप्त होतात कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनस्तराची हमी देतात समाजात कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभावपूर्ण व्यवहार करणे हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय आहे सध्या जीवन जगण्यासाठी सामाजिक न्यायाची नितांत गरज आहे असे विचार कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. गणेश बहादे सर यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानात मानवी हक्कांचा येतोचित सन्मान आणि आदर केलेला आहे मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी संविधानात पुरेशा तरतुदी करण्यात आल्या आहे याशिवाय राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ही मानवी हक्कांचे संरक्षण जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हक्काचे पालन केल्या जाते. अजूनही बराच लांब पल्ला गाठावयाचा आहे याकरिता मानवतावादी दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. प्रवीण करंजकर डॉ. नितेश तेलहांडे, डॉ. पंकज मून, डॉ. संजय दिवेकर, प्रा. आरती देशमुख, नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्वत, प्रीती सायंकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती सुपारे हिने तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद मुडे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधिका गोटेफोडे,आचल खिरटकर, रेशम खी, नेहा येलके, रुचिता वेले, स्नेहल कोटकर, पायल सेवेकर, सोनल दोडके, पल्लवी पिंपलशेंडे, तेजस आडे, उमेश चौधरी, उज्वला गुरुनुले, प्रशांत निवल, अरुण तीमांडे विजयालक्ष्मी जारोंडे, अंकुश वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर