
प्रशासकीय स्वराज्य निर्माण झालेच पाहिजे”- सत्यवान रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )खर्डी
खर्डी: शनिवार, दिनांक 10.12.2022 रोजी सकाळी 9.30 वाजता खर्डी विभाग एज्युकेशन सोसायटीचे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्डी या शाळेच्या प्रांगणामध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क भारत सरकार, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . व्याख्यानासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप विनायक अधिकारी, संचालक रवींद्र अधिकारी,मुख्याध्यापक विलास साळवे सर,पर्यवेक्षक महाजन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर व्याख्यानासाठी इयत्ता आठवी ते बारावी चे 1200 विद्यार्थी व सर्व शिक्षक हजर होते. सदर व्याख्यानामध्ये श्री रेडकर यांनी यूपीएससी एमपीएससी त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षा च्या बाबतीत मोफत मार्गदर्शन केलं. दरम्यान आपल्या विनोद बुद्धीने सर्वांची त्यांनी मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने आबासाहेब अधिकारी यांनी केली. निवेदक देशमुख मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
Total Users : 10829